अनिकेत साठे

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यात अलीकडेच झालेल्या काही कार्यक्रमांतील कमी गर्दीवरून विरोधक उपरोधिक सुरात टिपण्णी करीत असताना मनमाडमध्ये मात्र पूर्णत: वेगळे चित्र दिसल्याने मुख्यमंत्रीही सुखावले. करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजना आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन मनमाड शहरातील महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर हजारोंच्या उपस्थितीत झाले. मनमाडसाठी पाणीपुरवठा योजना किती महत्त्वाची आहे, हे इतक्या मोठय़ा उपस्थितीवरून लक्षात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनाही मान्य करावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनातून रखडलेले प्रश्न मार्गी लावता येतात. विरोधकांना शह देता येतो. शिवाय, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळविण्यासाठीच्या मोर्चेबांधणीलाही महत्त्व प्राप्त होत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या पहिल्या पाच आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. शिंदे गटात प्रवेश करणारे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. यातील दुसरे म्हणजे दादा भुसे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते कृषिमंत्री होते. गोहाटीत इतरांच्या तुलनेत ते उशिराने पोहोचले. तरीदेखील ज्येष्ठत्वाच्या मुद्दय़ावर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना बंदरे व खनिकर्म या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची माळही गळय़ात पडली. सुरुवातीपासून शिंदे गटाचे समर्थन करणारे मात्र अद्याप प्रतीक्षेत आहेत. लवकरच होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपले दावे बळकट करण्याच्या दृष्टीने अनेकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. या स्पर्धेत कांदेही उतरल्याचे मनमाडमधील शक्तिप्रदर्शनातून उघड झाले.

स्थानिक राजकारणात पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार कांदे यांच्यात फारसे सख्य नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्र्यांच्या मान्यतेने विकासकामांसाठी निधी दिला जातो. त्यामुळे कदाचित सध्या कांदेंना टोकाची भूमिका घेणे जड जाते. महाविकास आघाडीच्या काळात निधी वाटपातील दुजाभावावरून त्यांनी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी थेट संघर्ष केला होता. त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत सबुरीचा सल्ला देणाऱ्या तत्कालीन शिवसेना नेत्यांनाही जुमानले नव्हते. भुजबळांशी संघर्षांचे मूळ नांदगावच्या राजकारणात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार पंकज भुजबळांना कांदेंनी पराभूत केले होते.

नांदगावमध्ये शिवसेनेत दोन गट असले तरी त्यांचा ठाकरे गटापेक्षा भुजबळ आणि पर्यायाने राष्ट्रवादीच पहिला शत्रू आहे. त्यामुळे मनमाड शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी ३११ कोटींच्या योजनेचे भूमिपूजन सोहळय़ाचे त्यांनी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केले. मुख्यमंत्र्यांनी पाणी पुरवठा योजनेसाठी पालिकेने भरावयाची ४७ कोटी लोकवर्गणी राज्य शासन भरणार असल्याचे जाहीर केले. नियोजित एमआयडीसीसाठीचे सर्वेक्षण आणि मनमाड नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी १० कोटी मंजूर करण्यात आले. नांदगावमधील शिवसृष्टी प्रकल्प आणि अन्य विकासकामांना निधीची कमतरता भासणार नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटातील आमदारांना बळ दिले. राज्यातील मंत्रिमंडळात सध्या जिल्ह्यात एकमेव मंत्रिपद आहे. विस्तारात भाजप नाशिकला झुकते माप देईल. शिंदे गटाकडून तसा विचार होण्याची अपेक्षा बाळगली जाते. मनमाडमधील शक्तिप्रदर्शन या स्पर्धेतील एक टप्पा ठरला आहे.

श्रेयवादाची लढाई

भूमिपूजन सोहळय़ापूर्वी आ. आदित्य ठाकरे यांनी नांदगावच्या दौऱ्यावेळी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली होती. मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचा दावा केला होता. त्याचे श्रेय दुसऱ्याला देऊ नका, असे आदित्य यांनी म्हटले होते. भव्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करीत आ. सुहास कांदे यांनी पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. या सोहळय़ात सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांना व्यासपीठावर स्थान दिले गेले. अपवाद केवळ ठाकरे गटातील नेत्यांचा होता. या कार्यक्रमात पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार कांदे यांनी मनमाडकरांना पाणी पाजले, आता त्यांना विरोध करणाऱ्यांना जनतेने पाणी पाजण्याचा सल्ला दिला. या योजनेवरून शिवसेनेच्या दोन्ही गटात श्रेयवाद सुरू झाला आहे.

Story img Loader