लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी बेकायदेशीर ठरवून पाडून हजारो सभासद शेतकरी आणि कामगारांच्या रोजीरोटी हिरावून घेतली आहे. एवढी क्रूरता कधीही दिसून आली नव्हती. राज्यातील भाजपचे सरकार मायबाप सरकार नसून तर हैवान सरकार आहे, अशा कठोर शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Despite success in the assembly elections the future is challenging for Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासाठी भविष्यकाळ आव्हानात्मक? दिल्लीतील ‘महाशक्ती’चा पाठिंबा अजूनही? 
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
devendra fadnavis takes oath as chief minister of maharashtra for the third time
तीन ताल… फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी; शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पवारांचा सहावा विक्रमी शपथविधी

विमानसेवेसाठी हसिध्देश्वर साखर कारखान्याच्या ३८ मेगावाट क्षमतेची सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी अडथळा ठरते आणि बेकायदेशीर म्हणून पाडण्यात आली आहे. या कठोर कारवाईमुळे सहवीज निर्मिती कायमची बंद पडणार आहे. शिवाय दहा हजार मे. टन गाळप क्षमतेच्या सिध्देश्वर साखर कारखान्याचे आगामी सलग दोन गळीत हंगामही बंद ठेवावे लागणार आहेत. यात कारखान्याचे सुमारे दीड हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-सातारा: नेत्यांच्या इगोचा सातारकरांना फटका- शिवेंद्रसिंहराजे

या पार्श्वभूमीवर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आदींनी धाव घेऊन त्यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काडादी यांच्याशी संपर्क साधून धीर दिला. कारखान्यची चिमणी केवळ राजकीय द्वेषापोटी सत्ताधारी भाजपच्या आमदार-खासदारांच्या सांगण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडायला लावली आहे. त्याची किंमत भाजपला चुकवावी लागेल. त्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करायला तयार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमणी पाडकामासह विमानसेवेच्या मुद्यावर भाजपचा जोरदार समाचार घेतला. विमानसेवेसाठी सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडली हे खरे वाटत नाही. तर केवळ धर्मराज काडादी यांच्या विरोधात व्यक्तिद्वेषातून चिमणी पाडण्यात आली आहे. भाजपच्या आमदार-खासदारांना विमानसेवा सुरूच करायची होती तर बोरामणीच्या नवीन आंतरराष्टूरीय कार्गो विमानतळाच्या विकासासाठी निधी का आणला नाही? केवळ सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळ मंजूर करून आणले म्हणून भाजपने निधी दिला नाही, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. भाजपकडे धमक असेल तर बोरामणीचे विमानतळासह सोलापूरची विमानसेवा सुरू दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले. सोलापूर-तुळजापूर नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी देताना वाटेत माळढोक अभयारण्याची अडचण का आली नाही? रेल्वे मार्गावर माळढोक पक्षी आडवा नाही का? माळढोक पक्ष्याचा अडथळा बाजूला ठेवून नवीन रेल्वेमार्ग उभारता येते. तर बोरामणी विमानतळ का उभारता येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Story img Loader