विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माझ्याशी गैरव्यवहार करत मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. प्रसाद लाड यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर यांना पाच महिन्यांचा कारावास, २४ वर्षांपूर्वीच्या खटल्य…

Anil Parab and Niranjan Davkhare
मुंबईत शिवसेना उबाठाच! पदवीधर मतदारसंघात अनिल परब विजयी, तर कोकणचा गड भाजपाच्या डावखरेंनी राखला
prasad lad Ambadas Danve
“भाजपात जुम्मा-जुम्मा चार दिवस झालेला माणूस मला…”, सभागृहातील राड्यानंतर अंबादास दानवेंचा प्रसाद लाडांवर हल्लाबोल
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Rahul Gandhi
“मोदीजी लिहून घ्या…”, राहुल गांधींचं भर सभागृहात पंतप्रधानांना आव्हान
eknath shinde devdendra fadnavis
“कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?
60 unemployed youth duped by promising job in abroad
परदेशात नोकरीच्या आमिषाने ६० बेरोजगार तरूणांना ३६ लाखांचा गंडा 

नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?

“राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदुत्त्वाबाबत जे विधान केलं आहे. त्यावर विधान परिषदेत बोलताना मी राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव मांडत तो लोकसभेत पाठवावा तसेच त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी केली. त्यानंतर अंबादास दानवे हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले, तेव्हाही मी भाषण करत होतो. त्यावेळी अंबादास दानवे यांनी माझ्याशी गैरव्यवहार करण्यास सुरूवात केली. त्यांनी मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली”, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला. तसेच अंबादास दानवे यांनी हिंदुंचा अपमान केला असून त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, प्रसाद लाड यांच्या आरोपावर अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली. “विधान परिषदेत बोलताना माझा तोल सुटलेला नाही. मी एक शिवसैनिक आहे. जो माझ्यावर बोट दाखवेल, त्यांची बोटं छाटण्याची ताकद माझ्यात आहे. ज्या विषयाचा सभागृहाशी संबंध नाही, त्याविषयावर माझ्याकडे हातवारे करून ते बोलत होते”, असे अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा – मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी!…

“राहुल गांधी नेमकं काय बोलले, हे मी ऐकलेलं नव्हतं. मी विधान परिषदेच्या कामकाजात होतो. त्यावेळी भाजपाच्या आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. मी विरोधी पक्षनेता असल्याने मला त्यांना उत्तर देण्याचा अधिकार होता. हा मुद्दा आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का? असं मी सभापतींना विचारलं, त्यांनी हो किंवा नाही, असं उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र, त्यापूर्वी प्रसाद लाड यांनी माझ्याकडे बोट दाखवून बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी माझ्या जागेवरून पुढे जात शिवसैनिकाचा अवतार धारण केला”, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.