भीमा-पाटस कारखान्याचे अध्यक्ष व दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हत्याचे कट आखण्यात आला होता असे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुल कुल यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राहुल कुल रासपचे दौंड विधान मतदार संघाचे आमदार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या दोघांची कसून चौकशी करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असलेल्या राहुल कुल यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याचा कट आखण्यात आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla rahul kuls murder plan open by police 2 arrested on the spot
Show comments