सोलापूर : बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर संशय व्यक्त करत हल्ला चढवला आहे. यामध्ये राऊत यांनी सोमवारी पुन्हा एकदा जरांगे यांच्यावर कठोर शब्दात प्रहार केला. जरांगे हे आंदोलन आरक्षणासाठी करत नसून यातून त्यांचा महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव आहे. याबाबत सगळ्या जनतेलाच आता संशय निर्माण झाला असल्याची टीकाही राऊत यांनी या वेळी केली.
बार्शीत प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राऊत यांनी जरांगे यांच्या मराठा आंदोलनावर शंका उपस्थित करीत, त्यांचे आंदोलन मूळ हेतूपासून वेगळ्या मार्गाने भरकटल्याचा आरोप केला. बार्शीत मराठा कार्यकर्त्यांनी जरांगे-पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात विविध अकरा प्रश्न उपस्थित करून आंदोलन सुरू केले आहे. त्याची उत्तरे जरांगे-पाटील यांनी द्यावीत, अशी मागणी आमदार राऊत यांनी केली.
राऊत म्हणाले, की मी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर आंतरवाली सराटीत अनेकवेळा जाऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली होती. परंतु गेल्या ११ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बार्शीत येऊन आपले विरोधक माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट घेतली. त्यानंतर आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासून जरांगे हे आपल्याविरुद्ध भाष्य करीत आहेत, असा आरोप आमदार राऊत यांनी केला.
आंदोलन भरकटले
मराठा आरक्षण आंदोलन अलीकडे वेगळ्या दिशेने भरकटले असताना आंदोलन करण्यासह जरांगे-पाटील यांनी खुल्या चर्चेची दारे उघडी ठेवली पाहिजेत. त्यांनी प्रामाणिकपणे आंदोलन करावे. महाविकास आघाडीला राजकीय फायदा मिळावा या अप्रमाणिक हेतूने आंदोलन करू नये. त्यांच्या आंदोलनाची दिशा सध्या तरी योग्य वाटत नाही, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. जरांगे यांची शासनाने लावलेली एसआयटी चौकशी मागे घ्यावी, अशी आग्रही मागणी करणारा मी एकमेव आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला. जरांगे यांना अहंकाराने पछाडले आहे. त्यांनी अहंकार बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी लेखी आराखडा तयार करावा. त्यासाठी तज्ज्ञ मंडळींची मदत घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला