सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तत्काळ बोलवावे, या मागणीसाठी बार्शीत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यासंबंधी महायुती शासनाकडून अधिकृत निर्णय झाला नसला तरी हे विशेष अधिवेशन लवकरच होणार असल्याचे संकेत आमदार राऊत यांनी दिले आहेत. दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बार्शी येथील आंदोलनस्थळी धाव घेऊन आमदार राऊत यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून फारसे काही साध्य झाले नसल्याचे कळते.

बार्शीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार राऊत गेल्या तीन दिवसांपासून शेकडो समर्थकांसह ठिय्या आंदोलन करीत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नावर सुरुवातीला त्यांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले. दुसरीकडे जरांगे यांनीही आमदार राऊत यांचा बोलविता धनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असल्याचा प्रत्यारोप करून त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. दरम्यान मराठा आरक्षण प्रश्नावर आपली आणि जरांगे यांची भूमिका एकच असल्याचा दावा आमदार राऊत यांनी केला आहे.

BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Winter session of Parliament postponed due to many controversial issues like Constitution Adani Dr Ambedkar
संसदेचे वादळी अधिवेशन संस्थगित
unauthorized construction, Shri Gopal lal Mandir temple, Mira Road,
मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई
Solapur Mathadi kamgar protest, Mathadi kamgar,
सोलापुरात माथाडींच्या आंदोलनामुळे ५० हजार क्विंटल कांदा वाहनांमध्ये पडून
Public bodies demand alternative to POP Mumbai news
गणेशोत्सव मंडळाची बैठक निष्फळ; पीओपीला पर्याय देण्याची सार्वजनिक मंडळांची मागणी
Formulate policy to control stray dogs MLA Mahesh Landge demands in session
मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी धोरण ठरवा; आमदार महेश लांडगे यांची अधिवेशनात मागणी
Registration for CET exam admissions begin next week
सीईटीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार

हेही वाचा >>>Nitin Gadkari : “तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आमचा पाठिंबा, त्या नेत्याने..”, नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

ठिय्या आंदोलनस्थळी बोलताना आमदार राऊत यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी सभापती राहुल नार्वेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. सर्व पक्षांच्या आमदारांनाही निरोप दिला जात असून मराठा आरक्षण प्रश्नावर निर्णायक धोरण स्वीकारण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader