लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे हे मवाळ हिंदुत्ववादी नाहीत. पण हिंदुत्ववादापेक्षा भिन्न विचारांचे आहेत. म्हणून ते केंद्रात गृहमंत्री असताना त्यांच्या मुखातून हिंदू दहशतवादाचा शब्द निघाला. यावर बोलतच राहू. पण आता स्थानिक विकासाच्या मुद्यावरच निवडणूक जिंकण्याचा मनोदय असल्याचे सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सांगितले.

मंगळवेढा तालुक्यात प्रचाराच्या निमित्ताने भाजपचे स्थानिक आमदार समाधान अवताडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या तथा आपल्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडतानाच हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्यावर भर दिला. गेल्या दहा वर्षात सोलापुरात मोदी सरकारच्या मुद्रा लोनच्या माध्यमातून साडेचार लाख तरूणांनी स्वयंरोजगार मिळविला असून याच विकासाच्या बळावर आपण लोकसभा निवडणुकीत विजयाबद्दल निश्चिंत आहोत, असा दावाही त्यांनी केला.

आणखी वाचा-लोकशाही व संविधान रक्षणासाठी भाजपला धडा शिकवा- प्रणिती शिंदे

सोलापूरचा खासदार कसा असतो, हे आपण आता दाखवून देणारच आहोत, असे नमूद करीत आमदार सातपुते यांनी शिंदे पिता-पुत्रीला लक्ष्य केले. यावेळी बोलताना आमदार समाधान अवताडे यांनीही विकासाच्या मुद्याबरोबरच सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.