कर्जतमधील एमआयडीसीच्या प्रश्नावरून आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या वाकयुद्ध रंगलं आहे. आता राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवार एकदा सरकारच्या बाजूने तर एकदा सरकारच्या विरोधात बोलतात. पण, असं दोन तोंडी गांडुळासारखं बोलणं योग्य नाही, असा हल्लाबोल राम शिंदे यांनी केला आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तीन महिन्यांच्या आतमध्ये एमआयडीसीबाबत निर्णय होईल. पण, एमआयडीच्या जागेसंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकऱ्यांच्या जागा गुंतवणूकदारांनी विकत घेतल्या आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. सुशिक्षित बेरोजगार आणि नवयुवकांना काम मिळालं पाहिजे. पण, १९८६ स्थापन झालेल्या जामखेडच्या एमआयडीसीबद्दल का बोलत नाहीत?” असा सवाल राम शिंदे यांनी रोहित पवारांना विचारला आहे.

हेही वाचा : “चिन्ह राहिलं नाही तरी…”, ‘घड्याळा’बाबत रोहित पवार यांचं मोठं विधान

“तुमचं सरकार असताना कर्जतमध्ये उद्योग का आणले नाहीत? ग्रामपंचायत, मार्केट समितीत पराभव झाला आहे. त्यामुळे हा नवीन फंडा काढला आहे. दुसऱ्यांवर चिखलफेक करून काहीही होणार नाही,” असा हल्लाबोलही राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केला आहे.

‘राम शिंदे मंत्र्यांकडे जाऊन बसतात. उद्योगमंत्री एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्यासाठी हतबल आहेत,’ असा आरोप रोहित पवार यांनी केला. याबद्दल विचारल्यावर राम शिंदे म्हणाले, “मी सत्ताधारी पक्षातील आमदार आहे. त्यामुळे मंत्र्याकंडे बसायचं नाही, कोणाकडे बसायचं. त्यांचं सरकार असताना ते काय विरोधी पक्षात बसत होते का?”

हेही वाचा : VIDEO : “घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात, हिंमतवान लोक…”, भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका

“रोहित पवारांचा अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा विरोधात आहे. सरकारने २१० कोटी रुपयांचा निधी त्यांना दिला आहे. त्यामुळे एकदा सरकारच्या बाजूने तर एकदा विरोधात ते बोलतात. असे दोन तोंडी गांडुळासारखं बोलून चालत नाही. मी सत्ता पक्षातील आमदार असल्याने मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. विशेष करून अजित पवारांकडे जास्त जातो,” असा टोलाही राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla ram shinde attacks rohit pawar over karjat midc ssa