धाराशिव : सोलापूर-धाराशिव रेल्वेच्या मार्गाच्या संपादित जमिनीच्या मावेजाबाबत धादांत खोटी माहिती विरोधी पक्षाचे नेते पसरवित आहेत. अशा अर्धवटरावांच्या टिकेला आपण महत्व देत नाही, असा टोला भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लगावला.ठाकरे शिवसेनेचे खासदर ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांचे नाव न घेता त्यांनी ही टिका केली. आमदर पाटील यांनी शनिवारी प्रतिष्ठान भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाठक आदी उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, की सोलापूर – धाराशिव रेल्वेच्या मार्गाच्या संपादित जमिनीच्या मावेजाबाबत धादांत खोटी माहिती विरोधी पक्षाचे नेते पसरवित आहेत. जमिनीची आधारभूत किंमत ठरविणे आवश्यक आहे. त्याच मुद्यावर सर्व शेतकर्‍यांना संघटित करुन न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. काहीही करुन रेल्वेमार्गात जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना त्यांचा योग्य मोबदला मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी मंत्रालयातील अधिकार्‍यांशी चर्चाही केली आहे. लवकरच न्यायालयात हे प्रकरण दाखल केले जाणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी करु नये.दरम्यान, रेल्वेमार्गातील भूसंपादत मावेजाबाबत आमदार पाटील यांनी शेतकर्‍यांच्या अन्‍नात माती कालवल्याची टिका खासदार ओमराजेंनी केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आमदार पाटील म्हणाले, की अर्धवटराव चुकीची टिका करीत आहेत. त्यांना कोणत्याची बाबीची माहिती नसते. केवळ चमकोगिरी करणे त्यांना जमते. एकही धड काम करता आलेले नाही. त्यांचे कामही अर्धवट असते. त्यामुळे अशा टिकेला महत्व देण्याचे कारण नाही. विजयी झाल्याबरोबर लोकसभेत मोदींवर कौतुकाचा वर्षाव करणारे हे नेते आता कुवत नसतानाही पंतप्रधानांवर टिका करीत आहेत. अशा लोकांना महत्व देण्याचे कारण नाही.

Municipal Corporation takes action against 71 unauthorized stalls in Kolhapur news
कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी मोहीम
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Pedestrian subway unsafe Demand to appoint security guards Pune news
पिंपरी-चिंचवड: पादचारी भुयारी मार्ग असुरक्षित; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?

हेही वाचा >>>‘मंदिर वहीं बनायेंगे’ म्हणणाऱ्यांनी मंदिराची जागा का बदलली ? शरद पवारांचा सवाल

महायुतीच्या नेत्यांवर टिका करुन पुन्हा त्यातील काहींना फोन करुन सांगायचे की विरोधात असल्यामुळे आम्हाला बोलावे लागते. मनाला लावून घेऊ नका, हे उद्योग कोण करते आम्हालाही चांगले माहिती आहे. आमचा लोकसभेचा उमेदवार प्रबळ असल्याचे माहिती झाल्यानेच समोरुन पातळी सोडून टिका होत आहे, असा घणाघाती वारही पाटील यांनी केला.

जबाबदारी पार पाडेन

आमदार पाटील म्हणाले, की पक्षाने लोकसभेसाठी उमेदवार म्हणून लढण्यास सांगितले तर या जबाबदारीपासून मी पळ काढणार नाही.

Story img Loader