अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आरती सिंह यांनी अडीच वर्षात महिन्याला ७ कोटी रूपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहचवले. याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती रवी राणा यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरती सिंह यांना एकसुत्री कार्यक्रम दिला होता. खासदार नवनीत राणा आणि रवी राणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फसवा, असे निर्देश दिले होते. उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी एका प्राध्यापकाला आमच्यावर पोक्सोसारखा गुन्हा दाखल करावं म्हणून आरती सिंह यांनी प्रवृत्त केलं,” असा आरोपही राणांनी लावला आहे.

“कोल्हे हत्या प्रकरण सिंह यांनी दाबले”

“महापालिका आयुक्त यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. तेव्हा मी दिल्लीत होतो, तरीही माझ्यावर ३०७, ३५३ सारखे गुन्हे दाखल करण्यात आले. शेतकऱ्यासांठी दिवाळीत आंदोलन केलं, त्यावेळी दोन दिवस मला जेलमध्ये टाकण्यात आलं. तर, नवनीत राणा यांना नजरकैदमध्ये ठेवले गेले. उमेश कोल्हे हत्या प्रकरण सुद्धा आरती सिंह यांनी दाबण्याचा प्रयत्न केला,” असेही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla ravi rana allegation police commissioner arti singh over 7 crore send uddhav thackeray every month ssa