निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे. त्यासह ‘शिवसेना’ हे पक्षनावही वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अंधेरी-पूर्वमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी हा निर्णय लागू असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यावरून अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रवी राणा म्हणाले, “खरे शिवसैनिक आणि बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं नाव आपल्याला मिळेल हा उद्धव ठाकरेंचा दावा आयोगाने फेटाळला आहे. महाविकास आघाडीबरोबर जात बाळासाहेबांनी बनवलेल्या पक्षाची माती करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, असी टीकाही रवी राणांनी केली.

हेही वाचा – ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास

“देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचला”

चिन्ह गोठवल्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. “निवडणूक आयोग स्वायत्त असलं, तरी केंद्र सरकारच्या हाताखाली काम करतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या यंत्रणा आपल्या हातात ठेवल्या आहेत. मंत्र्यांच्या हातातही काहीही नाही. देवेंद्र फडणवीस त्यांचे खास आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचला आहे”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.