देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता आहे. भाजपाप्रणित एनडीएने ३५० चा आकडा पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. अशातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. ‘देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील’, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

रवी राणा काय म्हणाले?

“मी आपल्याला सांगतो की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलले आहेत. मात्र, आता मी जबाबदारीने सांगतो की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते दिसतील. कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे. देशाचं भविष्य उज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे”, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती

हेही वाचा : पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या भाजपालाच कानपिचक्या; म्हणाले, “फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका…”!

संजय शिरसाट काय म्हणाले?

“आमदार रवी राणा यांनी मोदी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे १५ दिवसांत त्यांच्याबरोबर येतील, असा मोठा दावा केला. त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. शिरसाट म्हणाले, “या गोष्टी जर तरच्या आहेत. त्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) यावं की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसंच त्यांना घ्यावं की नाही हे ठरवणारे उद्धव ठाकरे नाही तर ते नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी संजय शिरसाट यांना पडद्यामागे काही हालचाली सुरु आहेत का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “आता पडद्यामागे हालचाली नाही तर आता पडदा बाजूला गेलेला आहे. आता हालचाली या समोर व्हायला लागल्या आहेत. हे सर्वसामान्य माणसांनाही माहिती आहे. त्यांचे (उद्धव ठाकरे यांचे) प्रयत्न सुरू आहेत. त्यांना महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे उद्या ते आले तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनीही यावेळी केलं.

Story img Loader