आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. एकमेकांवर आरोप करताना या दोघांकडूनही मर्यादा ठेवली राखली जात नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आपल्या पदाचे भान ठेवता एकमेकांवर एकेरी भाषेत टीका करणे हा त्याचच एक भाग आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख लोकांना किराणा वाटप करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर अपेक्षेनुसार रवी राणा यांनीही बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याच्या घटनेवर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा

आमदार रवी राणा म्हणाले, “ मला असं वाटतं बच्चू कडू हा सोंगाड्या आहे. याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे काही आंदोलन करतो ते फक्त तोडीपाणीसाठीच करतो. तोडीबाज म्हणून त्याची एक ओळख आहे. म्हणून मला असं वाटतं की माझ्यावर जे राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करतात मला त्यांना एकच सांगायचं आहे, रवी राणामध्ये धमक आहे रवी राणा किराणा वाटतो, गोरगरिबांच्या आरोग्याची तपासणी करून देतो. मुलांना शिक्षणासाठी, गरिबांच्या मुलांच्या लग्नासाठी मदत करतो. एखाद्याच्या कुटुंबात मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधींसाठी मदत करतो, कारण रवी राणामध्ये धमक आहे. एखादा आदिवासी तरूण देशासाठी सीमेवर लढत असेल, तर त्याच्या कुटुंबाला रवी राणा स्वत:चा पगारही देतो.” टीव्ही 9 शी ते बोलत होते.

हेही वाचा : जे धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच हे चिन्ह गोठवण्याचं महापाप केलं – भास्कर जाधवांची शिंदे गटावर टीका

याशिवाय, “ गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूने आरोप करताना दहावेळा विचार केला पाहिजे. विधानपरिषद आली की त्यांना दमडी पाहिजे, राज्यसभा निवडणूक आली की दमडी पाहिजे. सरकारला पाठिंबा द्यायचा तर दमडी पाहिजे. गुवाहाटीला जाययचंय तर दमडी पाहिजे. मला असं वाटतं ज्या माणसाचं जीवनच पैसा आहे आणि स्वत:साठी तर अनेकजण जगतात, बच्चू कडूंना मी सांगेन लोकांसाठीही जगवून दाखव. ज्या पद्धतीने तू बोलतोस जरा एकदा खिशात हात टाकून दाखव, एखाद्या गरिबाला मदत करून दाखव. अरे रवी राणा तर किराणा वाटतो, तू एक किलो साखर तर वाटून दाखव. बच्चू कडूची नौटंकी महाराष्ट्रात, अमरावती जिल्ह्यात लोक पाहात आहेत.” असंही रवी राणा यांनी बोलून दाखवलं.

बच्चू कडू काय म्हणाले होते? –

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. मात्र, आपण या अधिकाराचं पतन करत पुन्हा किराणा देणाऱ्याला निवडून देतो, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. ते अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा – Gujarat Election : …म्हणून गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘एमआयएम’ उतरणार!

यावेळी बच्चू कडू म्हणाले, काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवालही बच्चू कडूंनी विचारला आहे. त्यांनी नाव न घेता राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावल्याचे दिसून आले.

Story img Loader