सध्या ज्वारीच्या काढणीचे दिवस सुरू आहेत. ज्याला ग्रामीण भागामध्ये जोंधळा काढणे असे म्हटले जाते. शेतामध्ये जाऊन महिला शेतकरी, शेतमजूर हे ज्वारी काढत आहेत . याला सुगी असे देखील म्हटले जाते. अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघामध्ये आमदार रोहित पवार हे मतदार संघामध्ये दौरा करत असताना त्यांनी जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे बाबासाहेब भोरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये महिला शेतकरी शेतमजूर ज्वारी काढण्याचे काम करत असल्याचे पाहिले.
तयार झालेल्या ज्वारीची पांढरी शुभ्र भाकरी खाताना या मागील कष्ट काय असतात हे जाणून घेण्यासाठी रोहित पवार स्वतः त्या महिलां शेतकऱ्यांच्या समवेत ज्वारी काढण्यासाठी शेतामध्ये गेले. यामध्ये किती कष्ट लागतात याचा अनुभव देखील त्यांनी घेतला. आणि त्यांनी त्या महिलांशी संवाद साधत ज्वारी देखील काढली. ज्वारी काढताना महिलांच्या हाताला होणारी इजा. ज्वारीचे पिक उपटून काढावे त्यावेळी आतड्याला पीळ पडतो.याचा प्रत्यक्ष अनुभव रोहित पवार यांनी देखील घेतला. आणि अशा पद्धतीने ग्रामीण भागातील लाडकी बहीण किती कष्टाचे काम करत आहे असे म्हणत त्यांनी या सर्व लाडक्या बहिणींना सलाम केला. व प्रत्येक ज्वारी खाणाऱ्या व्यक्तीने याचा अनुभव नक्की घ्यावा म्हणजे शेतकऱ्याला किती कष्ट पडतात याची जाणीव सर्वांना होईल अशी देखील रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले. सोशल मीडियावर सध्या आमदार रोहित पवार यांचा ज्वारी काढण्याचा अनुभव चांगलाच व्हायरल झाला आहे.