छत्रपती संभाजी नगर येथे औरंगजेबाची कबर आहे. ही कबर हलविण्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत आज अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, औरंगजेबाची कबर सर्व जाती धर्मातील मावळ्यांच्या पराक्रमाच्या शौर्याचे प्रतीक आहे. एवढा बलाढ्य औरंगजेब 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये बलाढ्य सेनेसह राहिला.

मात्र त्याला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र जिंकता आला नाही अखेर एवढा शक्तिशाली श्रीमंत औरंगजेब फक्त कबरी पुरताच  शिल्लक राहिला. आणि हा पराक्रम सर्व मावळ्यांचा आहे . असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की रयतेचे राज्य व्हावे, स्वराज्य स्थापन व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रातील सर्व समाजाचे जाती-धर्माची मावळे आपले प्राण पणाला लावून लढले.

संभाजी महाराज यांनी एक आदर्श येथील जनतेसमोर निर्माण केला. आणि औरंगजेब हा एक बलाढ्य व शक्तिशाली राजा जो 27 वर्षे या राज्यामध्ये जिंकण्यासाठी थांबला. त्याचे अनेक सरदार सैनिक नातेवाईक मारले गेले. आणि खऱ्या अर्थानं मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. यामुळे औरंगजेबाची साम्राज्य अखेर एका गबरी पुरते मर्यादित राहिले. आणि ती कबर हीच खऱ्या अर्थानं सर्व मावळ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. पराक्रमाची साक्षा आहे. जर औरंगजेबाची ही कबर काढली तर उद्या काहीजण हा इतिहास बदलतील. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक असणारी ही औरंगजेबाची कबर या ठिकाणी राहू द्या असे रोहित पवार म्हणाले.

Story img Loader