कर्जत : कंत्राटी नूतनीकरण न झाल्याने राज्यातील २० हजार संगणक परिचालक बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत तरी याबाबत सरकारने तात्काळ ठोस कार्यवाही करून संगणक परिचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे.
या संदर्भात त्यांनी पुढे बोलताना सांगितले की कायमस्वरूपी नोकरी नसल्याने आणि अल्प मानधन असल्याने संगणक परिचालक मानसिक तणावात असतानाच आता त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
परिणामी राज्यभरातील संगणक परिचालक संपावर जाण्याची देखील तयारी करत असून तसे झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ शकते. यामुळे सरकारने या संदर्भात ठोस कार्यवाही करून संगणक परिचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे .