Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh Murder : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार) पक्षाचे बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात कोणाची दहशत आहे? तसेच या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत आहेत का? या प्रश्नांना देखील त्यांनी उत्तरे दिली आहेत.

या संपूर्ण प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना क्षीरसागर म्हणाले की, “लोक घाबरलेले आहेत आणि लोकांमध्ये रोष देखील आहे. जिल्ह्यामधील सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, लोकांच्या मनात आहे की लवकरात लवकर आरोपींना अटक झाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, एका पीएसआयचं निलंबन
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या प्रकरणातीला आरोपींची नावे घ्यायला नेते घाबरतात इतकी दहशत जिल्ह्यात आहे का? याबद्दल बोलताना क्षीरसागर म्हणाले की, “बीड पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्याला उगाचच वासेपूर वगैरे म्हटले जात आहे. काही प्रकरणांमध्ये ही वस्तुस्थिती आहे, पण पुरोगामी विचारांना मानणारा आमचा जिल्हा आहे. जातीपातीचं बोललं जातं जिल्ह्याच्या बाहेर चर्चा होते. तसा विचार केला तर मी ज्या जातीचा आहे तिथं सुईच्या टोकाइतका माझा समाज आहे. तरीही मला माझ्या मतदारसंघातील लोकांनी दुसर्‍यांदा निवडून दिले आहे. पण काही राक्षसी वृत्तीची लोकं आहेत जी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करतात”. संदीर क्षीरसागर हे टीव्ही९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नेमकी दहशत कोणाची आहे?

“मी मस्साजोग गावात लोकांशी चर्चा केली. त्यामध्ये गावच्या लोकांनी वाल्मिक कराडचं नाव घेतलं. फक्त गावच आमच्या पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. ज्यांनी ही हत्या केली ते सुपारी घेऊन हत्या करणारे लोकं आहेत. याचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत. सभागृहात पहिल्यांदाच सर्वच पक्षाच्या लोकांनी, जिल्ह्यातील सहाही आमदारांनी हा विषय मांडला” असेही क्षीरसागर म्हणाले.

हेही वाचा>> कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड…

धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडचे जवळचे संबंध असल्याचे म्हणाले होते, मग वाल्मिक कराडला अटक करण्यामध्ये पोलिसांवर कोणाचातरी दबाव आहे का? याबद्दल बोलताना क्षीरसागर म्हणाले की, “सरकारने जाहीर केल्यानंतर दोन तीन दिवसात पोलीसांचा जिल्ह्यात शोध, तपास व्यवस्थित सुरू आहे. दोन नंबरचे धंदे पूर्णपणे बंद झाले आहेत. जो वाल्मिक कराडच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की ते माझे निकटवर्ती आहेत आणि पोलि‍सांनी जर ठरवलं तर कोणताही गुन्हेगार असला तरी त्याला २४ तासात अटक करतील. अटक झाल्यानंतर लोकांची मागणी आहे की, मंत्रिमंडळात जर धनंजय मुंडे असतील आणि त्यांच्या निकटवर्ती व्यक्तीची चौकशी सुरू असेल तर प्रशासनावर तपासात दबाव येईल किंवा तपासात सवलत दिली जाईल. माझी विनंती आहे की फास्ट ट्रॅकवर या प्रकरणाचा तपास घ्या. फोनचे सीडीआर तपासा. ६,९ आणि ११ तारखेला घडलेला घटनाक्रम… ८ ते १० दिवसांच्या सीडीआरमध्ये सर्व स्पष्टपणे तुमच्या समोर येईल”.

“सरकारला आमची विनंती आहे की हे गुन्हेगार ज्यांचे निकटवर्ती आहेत, ज्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे तोपर्यंत त्यांचे राजीनामे घेऊन, तीन चार महिन्यात जर सगळं स्पष्ट झालं तर पुन्हा त्यांना शपथ घ्यायला लावा. आम्हाला यामध्ये राजकारण करायचं नाही. पण वाल्मिक कराडसारखे खरे गुन्हेगार आहेत, ज्यांनी जिल्ह्यात दोन जातींमध्ये तेढ निर्माण केले आहे, जिल्हा शांत करायचा असेल तर याचा तपास करून दोषींना फाशीवर चढवलं पाहिजे”, असेही क्षीरसागर यावेळी म्हणाले.

पोलिसांवर दबाव आहे का? यावर बोलताना क्षीरसागर पुढे म्हणाले की, “नवीन एसपींची बदली झाल्यानंतर त्यांनी केलेली कारवाई जिल्ह्याला दिसून येतोय. पण अटक का झाली नाही हा प्रश्न आहे. ही यंत्रणा बदलूनही दोन-तीन दिवस उलटल्यानंतर अटक करणं ही फार मोठी गोष्ट नाही. अटक झाल्यावर तपास मोकळा होऊन जाईल. आम्ही मोर्चा काढतोय म्हणजे आम्ही राजकारण करत नाही. पणआज लोकांची भावना ही याचा मुख्य सूत्रधार पकडला गेला पाहिजे अशी आहे”.

Story img Loader