Sanjay Shirsat On Maharashtra Government Formation : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. विधानसभेचा निकाल लागून आज तब्बल आठ दिवस झाले आहेत. पण महायुतीकडून अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. सरकार स्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. मात्र, तरीही राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यातच गृहमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, गृहमंत्री पद हे शिंवसेनेला सोडायला भाजपा तयार नसल्याचं बोललं जात आहे.

यातच एकनाथ शिंदे यांना दिल्लीत मंत्रिपद देण्याच्या चर्चाही आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता शिवसेना (शिंदे) आमदार संजय शिरसाट यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार का? मंत्रिमंडळात नवीन चेहरे पाहायला मिळणार का? एकनाथ शिंदेंना खरंच कुठलं पद घ्यायचं आहे की नाही? अशा विविध मुद्यांवर संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. तसेच एक निश्चित आहे की एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

हेही वाचा : “…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”

संजय शिरसाट काय म्हणाले?

“हिंदुत्व सोडायला लावलं, तसेच जे काही प्रकार झाले ते या एका माणसामुळे झाले. त्याची जाणीव उद्धव ठाकरे यांना होत नाही हे दुर्देव आहे. एकनाथ शिंदे हे काल दरेगावावरून आले. त्यांना आताही बोलायला त्रास होत आहे. पण आज सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी दाखल होतील. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होण्याची शक्यता आहे. आता उशीर नको, तातडीने निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे ही एक बैठक होईल. तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची देखील एक बैठक होईल. दिल्लीवरून अमित शाह हे महायुतीच्या तिन्ही नेत्यांची चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांचे (भाजपा) पक्ष निरीक्षक मुंबईत येतील आणि मग गटनेत्याची निवड होईल. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सध्या सर्व नेत्यांच्या हालचाली सुरु आहेत”, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

मंत्रिमंडळात नवीन चेहरे पाहायला मिळणार का?

महायुतीच्या मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे, तर काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यावर प्रश्न विचारला असता संजय शिरसाट यांनी म्हटलं की,”मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत. कोणाला कोणतं खातं द्यावं? कोणाचा समावेश करावा आणि कोणाचा समावेश करायचा नाही हे सर्व हे त्या-त्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. त्यामुळे शिवसेनेचे कोणते मंत्री असावेत? राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे कोणते मंत्री असावेत? भाजपाचे कोणते मंत्री असावेत? हा ज्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. तसेच हे ठरवण्याचा अधिकार पक्षाच्या नेत्यांना आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदेंना खरंच कुठलं पद घ्यायचं नाही का?

खरी परिस्थिती काय आहे? एकनाथ शिंदेंना खरंच कुठलं पद घ्यायचं नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “एक निश्चित आहे की, एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी कोणतं पद घ्यावं? कोणतं पद घेऊ नये. त्याबाबत आम्ही त्यांना कोणताही सल्ला दिलेला नाही. त्या संदर्भातील निर्णय ते स्वत: घेतील. पक्ष प्रमुख म्हणून आणि आमच्या पक्षाचे नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. उद्या काय होईल याचा निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या हातात असेल”, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.

शिंदेंनी कोणतं पद घ्यावं? आमदारांचं मत काय?

एकनाथ शिंदे यांनी कोणतं पद घेतलं पाहिजे? पक्षातील आमदारांना काय वाटतं? यावर बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “एकनाथ शिंदे यांनी आमचं नेतृ्त्व करावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही ठामपणे सांगू शकतो की एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊ नये. राज्याच्या राजकारणात त्यांचा असलेला प्रभाव पाहता आणि त्यांची लोकप्रियता पाहता त्यांच्या लोकप्रियतेला आणखी गती द्यायची असेल तर त्यांच्या नेतृत्वाखाली याच सत्तेत असावं”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

Story img Loader