कोल्हापूर : विधानसभेतील अपयशाने सर्व काही गेले असे आम्ही समाजत नाही. पराभवाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी उभारी घेऊया, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी कार्यकर्त्यांना केले.

जिल्हा काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त आयोजित सर्वपक्षीय अभिवादन सभेत ते बोलत होते.पी. एन. पाटील हे कधीही पराभवामुळे खचून गेले नव्हते. त्यांची हि लढाऊ वृत्ती प्रेरणादायी आहे

हेही वाचा…नांदणी मठाला तीर्थक्षेत्र दर्जा; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही सर्व दहा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली होती. सर्व काही संपले अशी भावना न बाळगता पुन्हा एकदा उभारी घेण्याचे काम करूया, असेही आमदार पाटील म्हणाले. खासदार शाहू महाराज, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी. पाटील,उदय नारकर, बाबुराव कदम,सतिशचंद्र कांबळ, वसंत पाटील, डी.जी. भास्कर,भारती पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.

Story img Loader