पंढरपुरातील एका सभेत बोलताना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ठाकरे गटाला घाबरून माघार घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. “माघार घेणार नाही, आगामी निवडणुकीत उभा राहणार. ज्यांना पाडायचं आहे, त्यांनी आत्तापासून कामाला लागावं. सगळ्यांनी एकत्र या, पालथं पाडून मुंबईला जायला भाग पाडलं नाही, तर राजाराम पाटलाची औलाद नाही” अशा शब्दात पाटलांनी ठाकरे गटावर हल्लाबोल करताना विधानपरिषदेवर जाण्याच्या भूमिकेवरुन घुमजाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला विधानपरिषदेवर पाठवा आणि सांगोल्यातून…” शहाजी बापू पाटलांच्या मागणीनं भुवया उंचावल्या

सांगोला विधानसभेत पुढील लढाई शहाजी बापू पाटील आणि दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या घराण्यामध्येच होणार आहे. ही निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखाली चांगल्या फरकाने जिंकणार असल्याचा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला आहे. आगामी विधानसभेत २०० हून अधिक जागा शिंदे-फडणवीस जोडगाळीला मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

“माझं चिन्ह, पक्षनाव गोठवलंत, पण एवढं करूनही…”, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्र!

सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा, या मागणीवर पाटलांनी स्पष्टिकरण दिलं आहे. “अभिजित पाटील माझे भाचे आहेत. ते सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. शिंदे गटात त्यांनी यावं यासाठी माझा प्रयत्न आहे. तरुण वयात ते पाच-सहा कारखाने चालवत आहेत. अशा तरुणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्याची मी मागणी केली” असे पाटील यांनी म्हटले आहे.

“मग शरद पवार जे बोलले ती ‘स्क्रिप्ट’च होती का?, आम्ही पवारांना…”; संजय राऊतांच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतरही राज्यातील नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. “भाजपाला राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता” असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर शहाजी बापू पाटील यांनी टोलेबाजी केली आहे. “संजय राऊत पुराणातील नारद मुनीचं पात्र आहे. सर्व सुरळित झालं असताना तुरुंगात बसून काडी लावायचं काम ते करत आहेत. त्यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं या व्यक्तीपासून सावध राहावं” असा इशारा ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्त वाहिनीशी बोलताना शहाजी बापू पाटलांनी दिला आहे.