शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यातच आता खासदार संजय राऊत यांनीही आज एक गंभीर आरोप केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शिवाय, यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. शिवसेना नाव आणि निशाणीसाठी आतापर्यंत रुपये २००० कोटींचा सौदा झाला. असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. ज्यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी घणाघाती टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहाजीबापू पाटील म्हणाले, “जनसामान्यांत मनात लोकाशाही विषयी शंका निर्माण करण्याचं चुकीचं काम संजय राऊत करत आहेत. भक्कम पुराव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबाजूने सर्व निकाल लागत असल्याने, संजय राऊतांची मानसिकता ही बिघडलेली आहे. ते सध्या या देशातील लोकशाही बिघडवण्यासाठी, समाजातील मानसिकता बिघडवण्याचं काम करत आहेत आणि हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे.”

हेहा वाचा – “तुम्ही आणि संजय राऊत कोर्टात जी याचिका दाखल करणार आहात, त्यात…” किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना उद्देशून विधान!

याचबरोबर “सध्या संजय राऊत हे नागापेक्षाही विषारी फुत्कार हे त्यांच्या तोंडातून टाकत आहेत. मला खात्री आहे हा महाराष्ट्र सुजान आहे, बुद्धीमान आहे. राजकारणाचे परीपक्व राज्य म्हणून या राज्याकडे पाहीलं जातं.” असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी टीका केली आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.

याशिवाय “संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होणारी टीका म्हणजे सकाळचा पंधरा मिनिटांचा पुढारी आहे. महाराष्ट्र कसा भडकवायचा महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कसं भडकवायचं असं कुटील कारस्थानी गुण जन्मजात राऊत यांच्याकडे आहेत.” अशी बोचरी टीका आमदार शहाजी बापू यांनी या अगोदर संजय राऊतांवर केलेली आहे..