सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेतील जुन्या इमारती अज्ञाताकडून पाडून येथील भंगार चोरी होत आहे. शासकीय जागेतून होत असलेल्या चोरीची चौकशी करावी. संबंधितावर कारवाई करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी साताऱ्यात उपोषणास सुरु केले आहे. आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उबाळे यांच्या भूमिकेस पाठिंबा दिला. भंगार चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी ही मागणी ही दोन्ही आमदारांनी केली.
हेही वाचा- सातारा : अतिसंवेदनशील कास पठारावर हेलिकॉप्टर उतरल्याने खळबळ
सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेमध्ये असणाऱ्या शासकीय इमारती नियमबाह्यरित्या अज्ञातांकडून पाडल्या जात आहेत. त्या ठिकाणचे लोखंड, विटा ,मुरूम आणि भंगार साहित्य विकले जात आहे. त्याची नोंद कोणत्याही शासकीय विभागाकडे होताना दिसत नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व सिंचन विभागाकडे उबाळे यांनी चौकशी केली. तेव्हा हे काम कोण पाडत आहे याची माहिती कोणालाही नाही. प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचे उबाळे यांनी सांगितले. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याबाबत कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई होत नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. मागील काही दिवसांपासून ते आमरण पोषण करत आहेत.
हेही वाचा- “शी-शी-शी, नारायण राणेंकडे आम्ही…”, आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली; म्हणाले…
उबाळेंना आंदोलन स्थळी भेटण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे पोहोचले आणि थोड्याच वेळात आमदार महेश शिंदे ही तेथे आले.दोघांच्या येण्याने उपस्थितीतांच्या भुवया उंचावल्या. तर साताऱ्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली. भंगारचोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी दोन्ही आमदारांचा रमेश उबाळे यांना जाहीर पाठिंबाही दिला.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मिळालेल्या जागेत महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. त्या जागेतील सिंचन विभागाच्या इमारती तोडल्या जात आहेत .त्यातील लोखंड विटा मुरूम राडाराडा विकला जात आहे. त्याची नोंद कोणत्याही शासकीय विभागाकडे नाही.येथील भंगार कोण चोरत आहे. त्याचे पैसे कुठे जात आहेत. याची माहिती होत नसेल तर हा सगळा अनभिज्ञ कारभार आहे आणि याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. उबाळे हे जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी आंदोलन करत असतात, आजचे आंदोलन ही त्यांच्या स्वतःसाठी नाही तर शासनाच्या साठीच आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेतील शासकीय इमारती कोण पडतात. त्याची लोखंड मोठ्या प्रमाणात विकले जाते. तेथील साहित्यही चोरले जाते आणि हे प्रशासनास माहिती नसेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामध्ये प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. प्रशासनाने या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ का आली, त्याच्याही विचार गंभीरपणे करावा याबाबत कारवाई झाली नाही तर आम्ही दोघे मी आणि आमदार शशिकांत शिंदे यासाठी लढा देऊ, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा- “एकनाथ शिंदेंचा NIT भूखंड घोटाळा बाहेर काढण्यात भाजपाचा हात?” अजित पवारांचं मोठं विधान!
साताऱ्यातील राजकीयदृष्ट्या जागृत आणि वातावरण गरम असलेल्या दोन ताकतीच्या आमदारांनी आंदोलनस्थळी एकाचवेळी झालेली भेट साताऱ्यात जोरदार चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्याला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी वडाचे झाड भेट दिले .यावेळी उपोषणस्थळी दोघांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली.पण नंतर खेळीमेळीच्या वातावरणात या विषयावर दोघांनी मिळून पाठपुरावा करण्याचे ठरले.जास्त दिवस उपोषण करू नका असा सल्लाही त्यांना देण्यात आला.