वाई: साताऱ्यातील कुमठे ग्रामपंचायत (ता कोरेगाव) निवडणुकीसाठी गावात कोपरा सभा घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी व भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत रात्री जोरदार धुमचक्री झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके…एकदम ओक्के, कोण आला रे कोण आला…गुवाहाटीचा चोर आला, अशी घोषणा झाल्या . त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण  झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. कुमठे ग्रामपंचायतीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाची सत्ता असून या वेळेस ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे गटाच्या  पॅनेलमध्ये लढत होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Jarandeshwar Sugar Factory case: जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात अजित पवारांना सर्वोच्च न्यायालायाचा मोठा दिलासा

व्हिडिओ:

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/12/shashikant-mahesh-shinde-fighting.mp4

रात्री या गावात दोन्ही बाजूच्या पॅनेलची कोपरा सभा होणार होती. या कारणावरुन राष्ट्रवादी व भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत रात्री राडा झाला.कोपरा सभेसाठी आमदार महेश शिंदेही तेथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पन्नास खोके एकदम ओके, कोण आला रे… कोण आला.. गुवाहाटीचा चोर आला… अशी घोषणा दिल्या केली.आमदार शशिकांत शिंदेंच्या जयघोषाच्याही घोषणा दिल्या. त्यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पण, पोलिसांनी तातडीने गावात येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या महत्वपूर्ण गावात सत्ता यावी यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. यावेळी दोन्ही गटात ग्रामपंचायतीसमोरच राडा झाला. कुमठे ग्रामपंचायतीत एकुण १५ सदस्य आणि सरपंद एक असे १६ उमेदवार असून त्यासाठी दोन्ही बाजूकडून ३२ उमेदवार रिंगणात आहेत. ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातूनच रात्री गावात राडा झाला. यानंतर पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla shashikant shinde mahesh shinde campaign kumthe gram panchayat election campaign in satara ysh