वाई: लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी २०२४ची निवडणूक ही महत्वाची ठरणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून मला सर्वत्र जावे लागते.त्यामुळे मी जावली- कराडला गेलो. परंतु मी कोरेगाव मधूनच निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार असल्याचा निर्धार आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात कोरेगाव सातारा व खटाव तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी शिवाजीराव महाडिक , तेजस शिंदे, राजाभाऊ जगदाळे, जयवंत पवार, अरुण माने ,भास्कर कदम, संजय पिसाळ, समीर घाडगे, विक्रांत शिर्के, पंकज मिसाळ व तीन तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी विश्वास दाखवून कोरेगाव मतदार संघात उमेदवारी दिली होती. आज कोरेगावचे आमदार म्हणून केलेल्या विकास कामाची पुन्हा एकदा जनता पोच पावती देणार आहे .याबद्दल दुमत नाही. विकास कामाची स्वप्न व अमिषा दाखवून शिवसेना एकनाथ शिंदे गट आमदार महेश शिंदे यांनी निवडणुकीत निसटता विजय मिळवला. परंतु, त्यांनी मतदारांची भ्रमनिराश केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जशी फूट पडली तशी फूट इतर पक्षाचे पडली असली तरी जे निष्ठावंत आहेत. ही ओळख ही आमच्यासाठी पाठीवर थाप देणारी आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या अनुषंगाने साम-दाम-दंड-भेद विरोधात लढण्यासाठी व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कोरेगाव मधूनच निवडणूक लढणार आहे. कोरेगाव मतदार संघात राज्याचा अर्थसंकल्पाएवढा निधी आला नाही , हे आता जनतेला कळले आहे. आज निष्ठावंत म्हणून जो मला मानसन्मान महाराष्ट्रात आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे. .लोक सत्ताधाऱ्यांवर नाराज असून परिवर्तन होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. सातारा जिल्ह्यातही हेच परिवर्तन पाहण्यास मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.