रत्नागिरी : जलसंपदा खात्याच्यावतीने चिपळूण येथे पुररेषा आखण्यात आली असून ही पुररेषा चिपळूण शहर आणि परिसरात असलेल्या गावांना ८०% प्रभावित करणारी ठरली आहे. ही पूररेषा अन्यायकारक असून ती रद्द करावी अशी मागणी चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत केली आहे. त्यामुळे या अन्यायकारक पूररेषे बाबत आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे आता सर्व चिपळूणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

जलसंपदा खात्याने २०२१ मध्ये आलेल्या महापुरानंतर पुरेषा आखली. ही पुररेषा चिपळूण शहर व परिसरातील गावांवर ८०% प्रभावित करणारी ठरली आहे. मात्र ही अन्यायकारक पूररेषा रद्द करावी, अशी मागणी चिपळुणचे आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत केली.

Two tigress cubs die in Pench Tiger Reserve
वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
Kerala Crime
Kerala Horror : धक्कादायक! दलित तरुणीवर ५ वर्षांत ६२ जणांकडून बलात्कार; पोलि‍सांनी आतापर्यंत ४४ जणांच्या आवळल्या मुसक्या
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

आणखी वाचा-“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार निकम म्हणाले, पुर रेषेच्या अनुषंगाने नगरविकास खात्याने पूररेषा प्रभावित निळ्या रेषा मधील क्षेत्रावर बांधकाम परवानग्यांवरती पूर्णता निर्बंध लादले आहेत. परिणामी ३ वर्ष चिपळूण शहर व परिसरातील गावांचा विकास खुंटला आहे. चिपळूण नगरपालिकेला सुद्धा नागरिकांच्या मूलभूत सुविधा पुरवण्याकरता कोणतेही बांधकाम करणे शक्य होत नाही. वास्तविक जलसंपदाच्यावतीने पूर रेषा ही कोणत्याही ठोस व वस्तू स्थितीनिष्ठ आकडेवारी शिवाय आखण्यात आलेली आहे. कोणतेही ठोस आकडेवारी नसताना घाई गडबडीमध्ये अन्यायकारक रेषा आखण्यात आलेली आहे, असे निकम यांनी सांगितले.

आणखी वाचा-Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”

मागील तीन वर्ष जलसंपदा खात्याच्यावतीने वाशिष्टी व शिव नदीतील जवळपास १६ लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे गेले तीन वर्षे चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. म्हणून पूर रेषेचा पुन्हा सर्वे व्हावा. तसेच नगर विकास खात्याच्यावतीने नव्या बांधकामांवरती असलेले निर्बंध काही अटी व शर्ती शिथिल करावयात व बांधकाम परवानग्या देण्यात याव्यात, अशी ही मागणी आमदार शेखर निकम यांनी केली.

Story img Loader