वाई:सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांनी पुरस्कृत केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा पराभव करत १८ जागा जिंकत एकतर्फी  विजय मिळवला .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे, असं सांगत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे यांचा खरपूस समाचार घेतला .उदयनराजे यांची जागा मतदारांनी दाखवून दिली.आमचा हमाल”च त्यांच्यावर भारी पडला.

दंड थोपटत आ.शिवेद्रसिंहराजे यांनी खा.उदयनराजे यांना पालिकेच्या निवडणुकीसाठी आव्हान दिले.

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंना त्यांची जागा दाखवायची वेळ आलीय”, ‘वज्रमूठ’ सभेतून अजित पवारांचा हल्लाबोल

नुसतं घराण्याचं नाव आणि घराण्याच्या नावावर मत मिळवण्याचे दिवस उदयनराजे यांचे संपले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत राहणं ही उदयनराजेंनी पद्धत बंद करावी. उदयनराजेंनी सातारकरांसाठी काहीतरी करून दाखवावं, असे आव्हान शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना दिलं आहे. ही निवडणूक उदयनराजेंनी शेतकरी संघटनेचा मुखवटा घालून लढवली होती. सातारा विधानसभा, कोरेगाव आणि कराड येथे उदयनराजेंची काय ताकद राहिली आहे हे या निकालातून दिसून येत आहे असंही ते म्हणाले.

बाजार समिती तो झाकी है, नगर पालिका अभी बाकी है… असा सूचक इशारा देत सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे, असं सांगत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांनी खासदार उदयनराजे  यांच्यवर खरपूस टीका केली.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांनी पुरस्कृत केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलचा पराभव केला. यानंतर आमदार शिवेंद्रराजेंनी पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंचा समाचार घेतला.

हेही वाचा >>> “मिंधेंनी गद्दारी करुन मिळालेल्या खुर्चीचा उपयोग फक्त बुड टेकायला…” वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात

ही निवडणूक उदयनराजेंनी शेतकरी संघटनेचा मुखवटा घालून लढवली होती. सातारा विधानसभा, कोरेगाव आणि कराड येथे उदयनराजेंची काय ताकद राहिली आहे हे या निकालातून दिसून येत आहे. बाजार समिती ताो झाकी है, नगर पालिका अभी बाकी है… असा सूचक इशारा देऊन सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे असं ते म्हणाले उदयनराजेंची ताकद पहिल्या दिवसापासून नव्हती म्हणून स्वतः पुढे न येता शेतकरी संघटनेला उदयनराजेंनी पुढे केलं. राजू शेट्टींनी त्यांची संघटना उदयनराजेंच्या दावणीला बांधण्याचं काम केलं आहे. राजू शेट्टी यांनी तोडपाणी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा. लोकांचा स्वाभिमानी संघटनेवर विश्वास राहील असे पदाधिकारी राजू शेट्टींनी तयार करावेत, असे सांगत राजू शेट्टी  यांच्यावर देखील टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla shivendra raje bhosale slam mp udayanraje bhosale after wining 18 seats in apmc polls zws