साताऱ्यात बाजार समिती निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाचा दारूण पराभव झाला आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने या निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी या यशाचं रहस्य सांगत उदयनराजेंवर शाब्दिक हल्लाबोल केला. तसेच पुढील पाच वर्षे बाजार समितीचं काम चांगलं करू, असंही नमूद केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवेंद्रराजे म्हणाले, “मतदारांच्या आमच्यावरील विश्वास हेच या विजयाचं रहस्य आहे. त्यामुळे सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल, मापाडी या सगळ्या मतदारांचं अजिंक्य पॅनल आणि माझ्यावतीने आभार मानतो. या निवडणुकीत उदयनराजेंनी समोर शेतकरी संघटनेचं बाहुलं उभं करून ही निवडणूक लढली. त्यांना माहिती होतं की त्यांचा विजय होणार नाही. त्यांच्याकडे मतं नाहीत, लोक त्यांच्याबरोबर नाहीत. त्यांनी निवडणूक लढायची म्हणून लढली.”

“नगरपालिकेतूनही उदयनराजेंना हद्दपार करणार”

“एक चांगलं झालं की, त्यांची सातारा तालुक्यात काय परिस्थिती आहे हे त्यांना या निवडणुकीतून कळलं. नगरपालिकेतूनही उदयनराजे आणि त्यांच्या पक्षाला हद्दपार करण्याचं काम करणार आहोत. आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो. पुढील पाच वर्षे बाजार समितीचं काम चांगलं करू,” असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं.

हेही वाचा : VIDEO: उद्धव ठाकरेंच्या वज्रमुठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते उबाठावाले…”

“उदयनराजेंचा १७ एकर हडप करण्याचा प्रयत्न होता”

“उदयनराजेंचा १७ एकर हडप करण्याचा प्रयत्न होता. त्यांना तिथं प्लॉटिंग करायचं होतं. शहराचा विकास व्हावा, बाजार समिती मोठी व्हावी, शेतकऱ्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नव्हतं. ते जे बोलतात तो बोगसपणा असतो. ते केवळ डायलॉगबाजी करतात. मी त्याला नेहमी नौटंकी म्हणतो,” अशी टीकाही शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla shivendraraje bhosale comment after wining in satara market committee election pbs