राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे. अजित पवार यांनी अनेक आमदार आणि खासदारांना बरोबर घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह सत्तेत सहभागी झाले असून त्यांनी रविवारी (२ जून) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी देखील शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी ही बंडखोरी का केली? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा या बंडखोरीला पाठिंबा होता का? अशा विविध प्रश्नांवर राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आमदार सुनील शेळके म्हणाले, सत्तेत सहभागी होण्यापूर्वी साहेबांना (शरद पवार) विचारायला आम्ही जावं, असंही आम्हाला वाटत होतं. तिथे (सत्तेत जाण्याचा निर्णय झाला त्या चर्चेवेळी) सुप्रिया ताईसुद्धा होत्या. तिथे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे सर्व वरिष्ठ नेतेही होते. या सर्वांनीच जर हा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय योग्यच असेल. आमदार शेळके टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

अजित पवारांनी ज्या दिवशी (२ जून) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या दिवशी सकाळपासूनच राष्ट्रवादीचे अनेक नेते अजित पवार यांच्या बंगल्यावर येत होते. यावेळी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळेदेखील गेल्या होत्या.

हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; केली ‘ही’ मोठी मागणी

अजित पवारांना गद्दार म्हणणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर विरोधकांनी ५० खोके, गद्दार अशा उपाध्यांनी शिंदे व त्यांच्यासह गेलेल्या आमदारांवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांनाही गद्दार म्हटलं जाणार का असे प्रश्न अनेकजण करत आहेत. यावर काल (३ जून) सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. २०१९ ते २३ या चार वर्षात आता माझ्यावरही थोडी जबाबदारी आणि मॅच्युरिटी आली आहे. आपलं प्रोफेशनल काम व नाती यांच्यात गल्लत करायची नाही हे मला माहित आहे. माझं आणि दादाचं (अजित पवार) भांडण होऊच शकत नाही. कारण दादाविषयी माझ्या मनात प्रेमच होतं आणि पुढेही राहील, दादा माझा मोठा भाऊ आहे, इतक्या वर्षात मी कधीच त्याच्याशी वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही.

Story img Loader