Suresh Dhas – Prajakta Mali News Update: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सामान्य जनतेमध्ये मोठा रोष असल्याचं दिसून येत आहे. बीडमध्ये आज मूक मोर्चा काढण्यात येत असून सामान्य जनतेपासून सर्वपक्षीय नेतेमंडळी या मोर्चात सहभागी होत असल्याचं सांगितलं जात आहे. या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असून त्याला मंत्री धनंजय मुंडे संरक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. यावरून मोठी चर्चा सुरू झाली असतानाच आता या सगळ्या गोंधळात दुसरीकडे अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना लक्ष्य करतानाच प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली आहेत. अवैधरीत्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. या प्रकरणात नाव येत असल्याचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे आता यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे.

नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस?

“विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते”, असं विधान त्यांनी केलं होतं. तसेच, “जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे”, असंही ते म्हणाले होते.

Prajakta Mali: “महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही”, प्राजक्ता माळीचा सुरेश धसांच्या विधानावर संताप, पत्रकार परिषदेत झाले अश्रू अनावर!

विधानावर दिलं स्पष्टीकरण…

दरम्यान, प्राजक्ता माळीचं नाव सुरेश धस यांनी या प्रकरणाबाबत भाष्य करताना घेतल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना सुरेश धस यांनी यासंदर्भातली आपली नेमकी भूमिका मांडली आहे.

“मी रश्मिका मंदाना, प्राजक्ताताई, सपना चौधरी यांची फक्त नावं घेतली. का घेतली, आता मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडला. सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आणि तुम्ही कृषीमंत्री असून तिकडे रश्मिका मंदानांचा कार्यक्रम घेता? तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे? त्यावर टीका झाली. राजू शेट्टीही इथे येऊन गेले. त्यांनीही टीका केली. धनंजय मुंडेंना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही”, असं सुरेश धस म्हणाले.

Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका

प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार? सुरेश धस म्हणाले…

दरम्यान, सुरेश धसांविरोधात प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार दाखल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सुरेश धस यांनी भूमिका मांडली आहे. “कोणत्याही महिलेचा अवमान होईल असा एकही शब्द मी बोललेलो नाही. त्यांनी माझी प्रतिक्रिया पुन्हा एकदा बघावी. जर त्यात त्यांना काही अवमानकारक वाटलं, तर त्यांनी महिला आयोगाकडे जावं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्यानंतरही प्राजक्ताताईंनी ठरवलं तर माझी काही अडचण नाही. मी त्यांचा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम आवडीने पाहात असतो. मनात असं असतं की एक चांगली मराठी मुलगी प्रगती करतेय, बरं वाटतं. त्यांनी जर तक्रार केली, तर मी त्याला सामोरा जाईन. मला काहीच अडचण नाही. मी तर त्यांचा उल्लेख ‘प्राजक्ता ताई’ असा केला आहे”, असं सुरेश धस म्हणाले आहेत.