राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही.
भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात चुरसीची लढत होईल, असं चित्र दिसत होतं. पण प्रसाद लाड यांनी विजयी बाजी मारल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे ट्वीट करून दिली आहे. त्यांनी विजयी उमेदवार प्रसाद लाड यांना शुभेच्छा दिल्या असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचंही अभिनंदन केलं आहे. भाजपाला पहिल्या पसंतीची १३३ मतं मिळाली आहेत.
आतापर्यंत विधान परिषदेचे विजयी उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते)
शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी- प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (विजयी)
काँग्रेस -चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप (अद्याप निकाल अस्पष्ट)