राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपाच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून मतदारांनी सत्ताधाऱ्यांना नाकारल्याची टीका केली जात आहे. विधानपरिषदेच्या एकूण ६ जागांपैकी ४ जागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, नागपूर आणि अकोला या जागांसाठी एकमत होऊ न शकल्यामुळे या ठिकाणी निवणुका झाल्या आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का बसल्याचं स्पष्ट झालं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा