महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं आज १६व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सध्याचं राज्यातलं राजकारण याविषयी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं.
गेल्या काही काळात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या भागात दौरे करून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला आहे.
नसीरुद्धीन शाह यांचा एक चित्रपट होता जाने भी दो यारो.. त्यात गाणं होतं हम होंगे कामयाब एक दिन… मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणे कमयाब व्हाल आणि ही लढाई जिंकाल – बाळा नांदगावकर</p>
आता फक्त लढायचं नाही, तर जिंकायचंच या भावनेनं सर्व मनसे कार्यकर्ते उतरतील – बाळा नांदगावकर
सोळावं वरीस विरोधकांसाठी धोक्याचं आणि मनसेसाठी मोक्याचं – बाळा नांदगावकर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.