MNS 17th Anniversary: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७वा वर्धापन दिन असून आज पक्षप्रमुख राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही महिन्यांत राज्याच्या राजकीय वर्तुळातम मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला.
Mahararashtra Navnitman Sena Anniversary: ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मनसेच्या १७व्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन
ज्या दिवशी या लोकांची संभाषणं, बोलणं चॅनल्सवर दाखवणं बंद होईल, त्या दिवशी महाराष्ट्र सुधारलेला दिसेल – राज ठाकरे</p>
ज्या महाराष्ट्राने जगाला तत्वज्ञान दिलं, तो हा महाराष्ट्र आहे का? टीव्हीवर आपले लोक पाहावत नाहीत. – राज ठाकरे
इंदू मिलमध्ये इतकी मोठी वास्तू उभी राहिली पाहिजे, ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे की आख्खं जग तिथे ज्ञान मिळवायला बाबासाहेबांच्या चरणी आलं पाहिजे. पुतळे उभे करून हाती काही लागत नाही. जयंती आणि पुण्यतिथ्या यापलीकडे आपल्या हाती काही लागणार नाही. ते काय म्हणून गेले याचं आत्मचिंतन आपण करणार नसू, तर खरं सांगतो, महाराष्ट्राचं काही खरं नाही. आता जे काही चालू आहे, ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं आहे. असा महाराष्ट्र मी कधीही पाहिला नव्हता. इतकं गलिच्छ, घाण राजकारण, इतकी खालच्या थराची भाषा कधी आजपर्यंत पाहिली नाही
जनता सध्याच्या राजकीय तमाशांना विटलेली आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा महानगर पालिका निवडणुका लागतील, तेव्हा मनसे सत्तेर असणार म्हणजे असणार – राज ठाकरे
महापालिका निवडणुका कधी लागणार माहिती नाही. असं वाटतंय दहावीला नापास झालोय. काय वाटतं कधी? मार्च? मार्च गेलं की मग ऑक्टोबर? ऑक्टोबर गेलं की पुन्हा मार्च?
बहुमत हाती यायला भाजपाला १९५२ ते २०१४ इतकी वाट पाहावी लागली. पण मनसेला एवढा वेळ लागणार नाही. मी बहुमत लवकर आणणार. मनसे सत्तेपासून दूर नाहीये. मी फक्त आशा दाखवत नाहीये. मला माहितीये ते.
आज पक्षाची वेबसाईट आपण लाँच करत आहोत. डिजिटल पुस्तक वेबसाईटवरून डाऊनलोड करता येऊ शकतं – राज ठाकरे
भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर १७ हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं. असो, हे सगळे २२ मार्चचे विषय आहेत.
पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याचं काम मनसेनं केलं. बाकीचे हिंदुत्ववादी लोक कुठे होते? काय करत होते? चिंतन! बाकीचे म्हणतात आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता? तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीत तर कधी दिसत नाही ते. भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलवलं. विरोध करणारे हिंंदुत्ववादीच. मला आतलं राजकारण कळलं होतं. म्हणून मी म्हटलं तूर्तास नको, आत्ता हे राजकारण नको. आणि ज्यांनी हे केलं, त्यांचं काय झालं? असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कुणी
एका पत्रकार परिषदेत मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुमची ब्लू फिल्म जी आलेली आहे.. मी म्हटलं किमान ती काढली असती तर बरं झालं असतं, यांनी बघितली तरी असती. ब्लू प्रिंट काढली तर बघितलीच नाही कुणी. आधी सगळेच मला प्रश्न विचाराययचे की ब्लू प्रिंट कुठे आहे? ती जाहीर केल्यापासून आजपर्यंत कुणी मला प्रश्न विचारले नाहीयेत – राज ठाकरे
मराठी पाट्यांसाठी आंदोलन का करावं लागतं? कारण बाहेरून येणारे सगळे इथल्या मराठी लोकांना गृहीत धरतात. मनसेच्या आंदोलनानंतर सगळ्या ठिकाणी मराठी पाट्या लागायला लागल्या. मग आत्ताचं गेलेलं अडीच वर्षाच्या सरकारनेही जाहीर केलं की मराठी पाट्या सक्तीच्या करू. पण पुढे काहीही झालं नाही. या कुणालाच प्रश्न विचारले जात नाही – राज ठाकरे
मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नव्हते म्हणून आपण त्यांना आधी हात जोडून सांगितलं. ऐकलं नाही. मग हात सोडून सांगितलं, ऐकलं. पण आपल्याकडे आठवड्याला मराठी चित्रपट बदाबदा रिलीज होतात, की त्या सगळ्यांना चित्रपटगृह मिळणं अवघड होतं..
मोबाईलमध्ये मराठी रिंगटोनसाठी मनसेनं आंदोलन केलं. त्यानंतर दोन दिवसांत मराठी रिंगटोन सुरू झाली – राज ठाकरे
नाशिक पालिकेत मनसेच्या कारकिर्दीत पाच वर्षांत एकाही मनसेच्या पदाधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही – राज ठाकरे.
मशिदीवरच्या भोंग्यांचा समाचार येत्या २२ तारखेला मी घेणारच आहे.
मी गेल्या अधिवेशनात एक गोष्ट जाहीर केली होती. जरा बनवायला वेळ लागला, पण आजचा दिवस चांगला आहे. आपण गेल्या १७ वर्षांत काय काय केलं, अशी आपली काही आंदोलनं, त्यातल्या अनेक गोष्टी.. आता ते दर महिन्याला भरत जाणार प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे. याचं पहिलं डिजिटल पुस्तक आपण आज प्रकाशित करत आहोत. ते पुस्तक मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडे असलं पाहिजे – राज ठाकरे
मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलंय. पत्रकार मला जे प्रश्न विचारतात, ते इतर राजकीय पक्षांना विचारणार नाहीत. जे टोलनाके मनसेच्या आंदोलनामुळे बंद झाले. शिवसेना आणि भाजपानं त्यांच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की टोलनाके बंद करू. एक पत्रकार त्यांना प्रश्न विचारत नाहीये – राज ठाकरे
राजू पाटील पक्षाची बाजू एकटे विधानसभेत मांडत आहेत. शोलेमध्ये डायलॉग आहे ना.. एकही है, मगर काफी है.. ती विधानसभा भरली तर काय होईल यांचं?
भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे नैसर्गिक आहे. भाजपानंही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज भरती चालू आहे. ओहोटी येणार. कुणीही थांबवू शकणार नाही ते.
काही पत्रकार अनेक पक्षांना बांधले गेलेले आहेत. पूर्वी गाढवाला चालवण्यासाठी पाठीवर काठी बांधून त्यावर समोर गाजर बांधलेलं असतं. तसं काही पत्रकांना पाठीवर काठी बांधून समोर पाकिट असतं. हे जाणून-बुजून असा प्रचार करतात. मला काय विचारताय १७ वर्षांचं, त्या काँग्रेसचं काय झालंय बघा
१७ वर्षांचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. पक्ष कशातून गेला, कशातून जातोय हे बघणं गरजेचं आहे. काही लोक बोलतात की काहीजण पक्ष सोडून गेले. एकेकटे गेले. मग राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण निवडणुकींना मतदान का होत नाही असं विचारतात. मग ते १३ आमदार सोरटवर निवडून आले होते का?
संदीप देशपांडेंमुळे आत्मचरित्राची चार पानं वाढली. त्या दिवशी घटना घडली तेव्हा मी काही बोललो नाही. एक निश्चित सांगतो, ज्यांनी केलंय त्यांना आधी समजेल की हे त्यानं केलंय. मग सगळ्यांना समजेल की हे त्यानं केलंय. माझ्या मुलांचं असं रक्त मी वाया घालवू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आलेत. या फडतूस लोकांसाठी नाही – राज ठाकरे
एकदा दत्तो वामन पोतदार रायगडावर गेले. जाता जाता त्यांनी शेतकऱ्याला विचारलं पाऊस पडेल का? तो म्हणाला वाटत नाही. थोड्या वेळाने जोरात पाऊस पडायला लागला. एका घरावर टकटक केली. कोण आहे. त्यावर त्यांनी नाव सांगितलं, तर आतून आवाज आला इतक्या लोकांना जागा नाही. असं जर माझ्या बाबतीत झालं आणि माझ्याबद्दल एवढी मोठी घोषणा केली तर घेतील का मला घरात? – राज ठाकरे
गडकरी रंगायतनमध्ये राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात…
राज ठाकरे गडकरी रंगायतनमधील व्यासपीठावर दाखल झाले असून थोड्याच वेळात भाषणाला होणार सुरुवात..
राज ठाकरे गडकरी रंगायतन येथे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत.
१७ म्हणजे इतरांसाठी खतरा. आपण १७व्या वर्षात पदार्ण केलं आहे. हा प्रवास फार खडतर होता – बाळा नांदगावकर
“असं वाटतं मोदींना सांगावं दर महिन्याला दोन दिवस…”
वाचा गेल्या वर्षीच्या वर्धापन दिनी राज ठाकरे भाषणात काय म्हणाले होते…
मनसेसाठी मराठी कंटेंट क्रिएटर अंकिता वालावलकरनं कोकणी भाषेत घातलेलं गाऱ्हाणं चांगलंच व्हायरल झालं होतं…
"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो व्याप वाढत जाऊं दे रे महाराजा… आणि मनसेच्या इरोधात ज्या कुणी काय येडावाकडा केला असात तर त्याचो डाव त्याचारचं उलटांदे रे महाराजा… होय महाराजा !"
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 2, 2023
देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सच्या 'राज'भेटीत अंकिता वालावलकरचं मालवणी गाऱ्हाणं. ? pic.twitter.com/b7KF6bxD6a
मनसेकडून वर्धापन दिनासाठी टीजर शेअर करण्यात आला होता. यामध्ये नव्या आयुधांसह आणि नव्या दमाने नवनिर्माणासाठी मनसे सज्ज असल्याचा उल्लेख करण्यात आला होता…
नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज ! #मनसे_वर्धापनदिन pic.twitter.com/gMwIEfwoAF
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 7, 2023