मुंबईत छायाचित्रकार महिलेवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आज सांगलीतील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पोस्टाने बांगडय़ांचा आहेर पाठविला. तर मिरजेत आरोपींच्या पुतळ्याचे दहन करून पत्रकारांनी निषेध नोंदविला.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार सांगलीतील मनसेच्या महिला जिल्हाप्रमुख अॅड. स्वाती िशदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोस्टात जाऊन गृहमंत्री पाटील यांना बांगडय़ांचा बॉक्स पाठविला. या राज्यातील महिलांवर अत्याचार होत आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कारकिर्दीत महिला असुरक्षित आहेत. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करुन हा बांगडय़ांचा आहेर पाठविला. यावेळी सुनिता इनामदार, शैलजा कोळी, प्राची कुदळे, संगीता चव्हाण, वैशाली पडळकर, गीता पडळकर, सुशीला लाड, कलावती जाधव, सुलोचना जाधव आदी महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
मिरजेत पत्रकारांनी महाराणा प्रताप चौकात पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
आर. आर. पाटील यांना ‘मनसे’चा बांगडय़ांचा आहेर
मुंबईत छायाचित्रकार महिलेवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आज सांगलीतील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पोस्टाने बांगडय़ांचा आहेर पाठविला. तर मिरजेत आरोपींच्या पुतळ्याचे दहन करून पत्रकारांनी निषेध नोंदविला.
First published on: 24-08-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns activists gifted bangles pack to r r patil