विरार-डहाणू चौपदरीकरणामध्ये सफाळे उंबरपाडा व इतर दहा गावांच्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर घोषित न करण्यात आल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकल्पाच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात कपडे काढून आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला.

मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश घरत यांनी पालघरचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात कपडे काढले. यावेळी मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी मंगेश घरत त्याला ताब्यात घेतले आहे.

vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
new luxurious administrative building of thane municipal corporation will be constructed on site of Raymond Company residents oppesed
निसर्गसंपन्न परिसर म्हणून कोट्यावधींची घरे घेतली पण, तेच नष्ट होतेय
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त
pcmc issue seized notice to Hotels hospitals schools and educational institutions over property tax arrears
पिंपरी : थकबाकी असलेले हॉटेल, रुग्णालय, शाळा होणार जप्त
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
Radhakrishna Vikhe Patil statement that the Municipal Corporation will get an increased quota if water is reused Pune news
पाण्याचा पुनर्वापर केल्यास महापालिकेला वाढीव कोटा; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंची स्पष्ट भूमिका

विरार-डहाणू चौपदरीकरणाच्या प्रकल्प टप्पा तीन अंतर्गत विविध तालुक्यातील जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये पालघर तालुक्यातील काही गावांचाही समावेश आहे. बाधित होणाऱ्या गावांपैकी नऊ गावांचा भूसंपादनाचा दर प्रांताधिकारी यांनी जाहीर केला आहे. मात्र उंबरपाडा व इतर दहा गावांचे दर अजूनही जाहीर केले नसल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जमिनीचा दर काय हे समजू शकत नव्हते. हे लक्षात घेता शेतकर्‍यांच्या वतीने मनसे मार्फत या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी आंदोलन केले गेले. इतर गावांचा दर जाहीर झाला असताना उंबरपाडा व दहा गावांचा दर जाहीर का केला नाही ? असा सवाल मनसेच्या शिष्टमंडळाने सक्षम प्राधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या समोर उपस्थित करून हा दर आजच जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली.
तर, हा दर कायद्यान्वये सध्या लगेचच जाहीर करता येणार नाही असे पालघरच्या उपविभागीय अधिकारी यांनी सांगितल्यानंतर मनसेच्या मंगेश घरत यांनी प्रांताधिकारी यांच्या समोर आपले कपडे काढायला सुरुवात केली व जोरदार घोषणाबाजी करून प्रांत अधिकार्‍यांचा निषेध नोंदवला.

या बाबत उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांच्याकडे विचारणा केली असता भूसंपादन प्रक्रियेनुसार व दर जाहीर करण्याच्या प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांनी केलेल्या दराची मागणी लक्षात घेतल्यानंतरच दर जाहीर करता येणार आहेत असे त्यांनी सांगितले.

Story img Loader