मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेमध्ये दिलेला ३ मे रोजीचा अल्टिमेटम आज संपत असून उद्या राज्यात काय परिस्थिती निर्माण होणार आहे? यासंदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पोलिसांच्या नोटिसा मिळाल्याची माहिती दिली. “मला आणि नितीन सरदेसाई यांना पोलिसांनी फौजदारी नोटीस दिली आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो”, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१ मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी काही अटी घालून दिल्या होत्या. यातल्या काही अटींचं सभेदरम्यान उल्लंघन झाल्याची बाब मांडण्यात आली होती. त्यानंतर देखील ४ मे पासून राज्यात मनसेकडून कायद्याचं उल्लंघन केलं जाऊ नये, यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली.

“सरकारचा मी धिक्कार करतो”

“शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी फौजदारी नोटीस दिलेली आहे. ती नोटीस मला आणि नितीन सरदेसाई यांना दिलेली आहे. ती आम्ही स्वीकारली आहे. त्याचं स्वागत करायला पाहिजे. राज ठाकरेंनी जाहीर सभेत भूमिका मांडली असून त्यावर आम्ही ठाम आहोत. फक्त बोलल्यानंतर जर नोटीस येत असतील आणि वर्षानुवर्ष परवानगी न घेता कायदे तोडले जात आहेत. अनधिकृत मशिदी बांधल्या जात आहेत. मशिदींवर भोंगे वाजवले जात आहेत. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे हे सरकार मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारं सरकार आहे. त्याचा मी धिक्कार करतो”, अशा शब्दांत बाळा नांदगावकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“अशा नोटिसा येतच असतात”

दरम्यान, नितीन सरदेसाई यांनी यावर प्रतिक्रिया देत असताना अशा नोटिसा येतच असल्याचं म्हटलं आहे. “अशा नोटीस येत असतात. ठीक आहे. पक्षानं भूमिका घेतली आहे. पण सरकारनं ठरवलंच आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायचंच नाही. नोटिसा देत आहेत. अशा नोटिसा आम्हाला आत्तापर्यंत खूप आल्या. ठीक आहे”, असं ते म्हणाले.