Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. मतदानानंतर आज २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला बहुमत मिळालं. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. तसेच या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही मोठा धक्का बसला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एक आमदार निवडून आला होता. मात्र, या २०२४ च्या निवडणुकीत मनसेला साध खातंही खोलता आलेलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल १२८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. एवढंच नाही तर विधानसभेच्या प्रचारात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा गद्दार असा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला होता. महाविकास आघाडी आणि महायुतीवरही जोरदार टीका केली होती. तसेच कोणत्याही परिस्थिती मनसे सत्तेत बसेल म्हणजे बसेल, असं विधान देखील राज ठाकरे यांनी केलं होतं. तसेच महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात द्या, असं आवाहनही राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी जनतेला केलं होतं. मात्र, राज ठाकरे यांचं हे आवाहन जनतेने धुडकावून लावलं.

हेही वाचा : अजित पवार यांची निकालांवर पहिली प्रतिक्रिया “लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, महाराष्ट्रात इतकं मोठं यश..”

राजू पाटील यांचा पराभव

मनसेच्या १२८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही पराभव झाला. तसेच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही कल्याण ग्रामीण मतदारसंघामधून पराभव झाला.

अमित ठाकरेंचा पराभव

माहीम विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली. या मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान होते. हे आव्हान त्यांना पेलवता आले नाही. कारण त्यांचे निवासस्थान असलेल्या या मतदारसंघातून त्यांचा दारूण पराभव झाला.

बाळा नांदगावकर यांचा पराभव

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. एवढंच नाही तर बाळा नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा देखील घेतली होती. मात्र, तरीही बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला आहे.

मनसेच्या कोणत्या मोठ्या नेत्यांचा पराभव

अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून पराभव झाला, संदीप देशपांडे वरळी मतदारसंघातून आणि बेलापूरमधून गजानन काळे यांचाही पराभव झाला.

मनसेचं ‘इंजिन’ रुळावरून घसरल्याची चर्चा

विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यामुळे मनसेचं ‘इंजिन’ रुळावरून घसरल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच राज ठाकरेंना जनतेने का नाकारलं? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेकजण वेगवेगळे प्रश्न आणि मत मांडत आहेत.