राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असणारे काही जुणे-जाणते नेतेमंडळीही अजित पवारांबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे शरद पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करून पक्ष पुन्हा उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना दुसरीकडे ही सगळी खेळी खुद्द शरद पवारांचीच असल्याचा अप्रत्यक्ष दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर २०१९प्रमाणेच पुन्हा एकदा अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेले आमदार माघारी येतील, असाही एक अंदाज व्यक्त केला जात असताना राज ठाकरेंनी मात्र मोठा दावा केला आहे.

“महाराष्ट्रात तडजोडींचं पेव फुटलंय”

मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडींवर थोडक्यात भाष्य केलं. “दिवसेंदिवस राजकारण किळसवाणं होत चाललंय. या लोकांना मतदारांशी काहीही देणं-घेणं नाही. कुठल्या पक्षाचे मूळ मतदार का त्यांचे मतदार होते याचा सगळ्यांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाट्टेल त्या तडजोडी करायच्या याचं महाराष्ट्रात पेव फुटलं आहे. लोकांनी याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. येत्या काही दिवसांत मी यावर सविस्तर भूमिका मांडेन. काही दिवसांत माझा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. त्यावेळी मी लोकांची भेट घेईनच”, असं राज ठाकरे म्हणाले.

Video: “अजित पवारांनी तीन वेळा प्रयत्न केले”, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “मी ऑन कॅमेरा सांगतो की…!”

शरद पवारांना उद्धव ठाकरेंचं ओझं उतरवायचं होतं?

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना त्यांच्या ट्वीटमधील उल्लेखाबाबत विचारणा केली. “उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच”, असं राज ठाकरेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. आपली भूमिका बरोबरच असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

“अर्थात.. शरद पवार काहीही म्हणत असले की त्यांचा या गोष्टींशी काही संबंध नाही वगैरे.. पण दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे असेच जाणार नाहीत तिकडे. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झाल्या, तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कशाला काही सोयर-सुतकच राहिलेलं नाही. हा सगळा पोलिटिकल ड्रामाच पाहात आहोत आपण. या सगळ्याची सुरुवात पहाटेच्या शपथविधीनं झालं. मग शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी झालं. आता महाराष्ट्रात शत्रू कोण, मित्र कोण हे काही राहिलेलंच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.