मागील काही दिवसांमध्ये राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना पक्षात उभी फूट पडली. सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे सरळ दोन गट पडले आहेत. असे असताना मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेतील पक्षफुटी आणि त्याची कारणं यावर सविस्तर भाष्य केलं आहे. शिवसेना पक्षफुटीला कुटुंबातीलच लोक जबाबदार आहेत, असे भाष्य राज ठाकरे यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शिवसेना फुटीला भाजपा जबाबदार की शरद पवार? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

राज ठाकरे यांनी झी २४ तास या मराठी वृत्तवाहिनीला मुलाख दिली. या मुलाखतीत बोलताना ” शिवसेना का फुटली यावर लोकांना थेट आरोप करता येत नाहीत. त्यामुळे संजय राऊतांसारखे एक माध्यम निवडायचे आणि झोडायचे. आपल्या मनातला राग काढायचा असे केले जाते. मात्र शिवसेना विखुरण्याला कुंटुबातीलच लोक जबाबदार आहेत. राजकारण तसेच इतर व्यवहारामध्ये त्यांची दखल जास्त प्रमाणात व्हायला लागली तेव्हापासूनच या गोष्टी घडत गेल्या. मिही त्याच कारणामुळे बाहेर पडलो. आता बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे तसेच इतर आमदारांना विचारा तेही हेच सांगतील,” असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>>“…म्हणून पहिल्या दिवसापासून मनाशी खूणगाठ बांधली,” देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सत्तापरिवर्तनामागचे नेमके कारण

“चांगल्या काळामध्ये सत्तेवर यायचं, संपत्ती गोळा करायची. वाईट काळ आला की बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर लोकांना भावनिक करायचं, असे उद्योग सुरु आहेत. असुरक्षित माणसं कधीही प्रगती करु शकत नाहीत. ते याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर प्रवास करत असतात. कोणी उतरवलं की त्यांना त्याची जाणीव होते,” असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना त्यांचे नाव न घेता लगावला.