महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी प्रदर्शित होणाऱ्या ‘हर हर महादेव’ या बहुभाषिक चित्रपटाला आपला आवाज (व्हाईस ओव्हर) दिला आहे. हा चित्रपट मराठी, हिंदीसह एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला ‘व्हाईस ओव्हर’ देताना आपण तिरळाच झालो असतो, असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी अभिनेते सुबोध भावे यांना दिलेल्या खुल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. याबाबतचा एक किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाला आवाज देण्याचा कोणताही अनुभव पाठिशी नसल्याने अनेकदा रिटेक घ्यावा लागला. यामुळे सतत स्क्रीन आणि काचेकडे पाहिल्याने आपण तिराळंच झालो असतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबतचा किस्सा सांगता राज ठाकरे म्हणाले, चित्रपटाला आवाज देत असताना स्टुडिओमध्ये माझ्यासमोर एक स्क्रीन लावली होती. मी काय बोलयचंय? ते संबंधित स्क्रीनवर लिहिलं होतं. तर डाव्या बाजुला एक काच होती, ज्याच्या पलीकडे दिग्दर्शक आणि इतर लोक होते. आवाज रेकॉर्ड केल्यानंतर, आवाज बरोबर आला रेकॉर्ड झाला आहे का? याची पुष्टी करण्यासाठी मला सतत काचेकडे पाहावं लागत होतं. यामुळे मी तिरळाच झालो असतो, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला आहे.

चित्रपटाला आवाज देणं सोपी गोष्ट नाही. ऱ्हस्व आणि दीर्घ शब्दांचे उच्चर कसे असावेत, यासाठी खूप कष्ट करावे लागतात. ‘व्हाईस ओव्हर’ देणं भाषण देण्याइतकं सोपं नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray give voice over to har har mahadev movie rmm
Show comments