महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राज ठाकरे दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पण या भेटीमागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पुणेकरांना महापालिकेनं पाठवलेल्या मिळकत कर वसुलीच्या नोटीसांसदर्भातील एक पत्र देण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे.

पुणे महापालिकेने अचानक शहरांत पूर्वलक्षी प्रभावाने मिळकत कर वसुलीच्या नोटिसा पुणेकरांना पाठवल्या आहेत. १९७० च्या एका ठरावाप्रमाणे करपात्र मुल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणे मिळकत करात काही सूट दिली जात होती. २०१९ ला ही सूट विखंडित करण्यात आली. मधल्या ४८ वर्षांच्या काळात महालेखा परीक्षणात एकही आक्षेप आलेला नसताना ही सूट विखंडित का केली? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Raj Thackeray
Raj Thackeray: ‘मी सामान्य राजकारणी नाही, मला इतरांप्रमाणे समजू नका’, एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर राज ठाकरेंचं मोठं विधान

हेही वाचा- राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट? ‘वर्षा’वर राजकीय हालचालींना वेग

तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिलेली असली तरी, यावर कायम स्वरूपी निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतचं एक पत्रही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे.

याशिवाय राज्यातील गोरगरीब आणि दुर्गम भागातील जनतेच्या विविध आरोग्य तपासण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठीच्या एका तंत्रज्ञानाचं सादरीकरणही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमोर करण्यात आलं आहे.