Raj Thackeray Criticizes Sharad Pawar: बदलापूरमध्ये शाळेतील ३ वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत. राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं कार्यक्षमपणे कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवार गटाच्या आंदोलनात शरद पवारांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली. मात्र, यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांवरच टीका केली आहे.

नेमकं काय घडतंय राज्यात?

बदलापूर प्रकरणावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. २४ ऑगस्ट रोजी म्हणजेच शनिवारी महाराष्ट्र बंद पाळला जाणार होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद पाळण्यास नकार दिला. त्यामुळे बंदची हाक मागे घेत महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्यभर व्यापक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आज ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे.

Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
sharad pawar pune protest speech
बदलापूरमधील घटनेवरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पुण्यातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी सरकारवर टीका करताना उपस्थित आंदोलकांना शपथ दिली.

शरद पवारांनी काय टीका केली?

“आजच्या स्थितीत जे घडलं त्याची गांभीर्यानं नोंद सरकारनं घेतली पाहिजे. संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. मला एका गोष्टीचं दु:ख होतंय की राज्यकर्ते, राज्याचे प्रमुख आणि त्यांचे काही सहकारी म्हणतायत की बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण आणतायत. मुलीबाळींवरील अत्याचाराबाबत कुणी आवाज उठवला तर त्याला राजकारण म्हणायचं हा निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत, भगिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

आंदोलकांना दिली शपथ

“मी, अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझा परिसर, माझे गाव, माझे कार्यालय अशा कोणत्याही ठिकाणी जर महिलांची छेडछाड किंवा अत्याचार होत असेल, तर त्यास मी विरोध करून त्याबद्दल आवाद उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करणार नाही. महिलांचा सन्मान राखीन आणि या पुण्यनगरीत, महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित व भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करीन. जय हिंद”, अशी शपथ यावेळी शरद पवारांपाठोपाठ आंदोलकांनी घेतली.

राज ठाकरेंची टीका

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना शरद पवारांनी शपथ दिल्याच्या मुद्द्यावर विचारणा केली असता त्यांनी त्यावर टीका केली. “शपथा कसल्या घेताय? तुमच्या हातात जेव्हा सरकार येतं तेव्हा या गोष्टी करा ना”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, त्यांनी विरोधकांचं सरकार असताना बलात्काराच्या घटना कमी का झाल्या नाहीत? असा सवालही आंदोलन करणाऱ्या विरोधकांना केला आहे.

Sharad Pawar in Pune Protest: “मला एका गोष्टीचं दु:ख होतंय की…”, शरद पवारांनी मांडली भूमिका; पुण्यात भर पावसात आंदोलन, उपस्थितांना दिली शपथ!

“पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावर बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. आकडेवारी पाहाता रोज एक प्रकरण बाहेर येत असेल, तर ते प्रत्येक तासाला एक प्रकरण बाहेर यायला हवं. बदलापूरचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. या आरोपींना ठेचलंच पाहिजे. याचं कारण आपल्याकडे अजून कठोर कायदा, शासन होत नाही. निर्भया प्रकरणात सगळं स्पष्ट झाल्यानंतरही अनेक वर्षांनंतर गुन्हेगारांना फाशी झाली. एवढा उशीर होत असेल तर काय करायचं? या अशा गोष्टी आज बंद पुकारला त्यांच्याही काळात होत्या. आत्ता जे रोज वर्तमानपत्रातून या घटना समोर येत आहेत, त्यामागे काही राजकारण आहे का? येणाऱ्या निवडणुका आहेत का?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.

Story img Loader