Maharashtra Day 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विटरवर खास पोस्ट केली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांना कसा महाराष्ट्र अपेक्षित आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे यांनी आज सकाळीच महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता सोशल मीडियावर व्हिडीओसहित पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, “जे मी जगात पाहिलंय ते मी महाराष्ट्रात आणू इच्छितो. अख्ख्या जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हेच फक्त माझं स्वप्न आहे.”

या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंचा आवाज ऐकू येत असून “आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा” असा संदेशही या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

१ मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray special post on social media on the occasion of maharashtra din sgk