दहीहंडी, गणेशोत्स्व, दसरा, दिवाळी अशा सण-उत्सवाच्या काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनर्स आणि जाहिराती लागल्याचं चित्र दिसून येतं. हे बॅनर्श शहर विद्रूप करतात की नाही? यावर दोन्ही बाजूंनी मतं मांडली जात आहेत. पण त्याचवेळी या बॅनर्सच्याही पलीकडे दुकानांच्या नावांच्याच पाट्यांवरून गेल्या काही काळापासून वाद निर्माण झाला होता. या मुद्द्यावर मनसेनं खळ्ळखट्याक् आंदोलनही केलं होतं. अखेर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर न्यायालयानंही या व्यापाऱ्यांना पाट्यांसंदर्भात निर्देश दिले आणि या प्रकरणार पडदा पडला. याचसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता एक सविस्तर पोस्ट करून आक्षेप घेणाऱ्या व्यापाऱ्यांना तंबी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

दुकानांच्या पाट्यांवर नावं इंग्रजी किंवा हिंदीबरोबरच मराठी भाषेतही आणि मोठ्या अक्षरात असावीत, अशी मागणी मनसेनं लावून धरली होती. यावर बऱ्याचदा आंदोलनंही झाली. यानंतर राज्य सरकारनं तसा आदेशही काढला. मात्र, या आदेशाला काही व्यापाऱ्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या आव्हानावर सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला असून त्यासंदर्भात राज ठाकरेंनी एक्सवर (ट्विटर) ही पोस्ट केली आहे.

Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
mahayuti , Municipal Elections, leaders MNS ,
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत सामील व्हा, मनसेच्या बैठकीत प्रमुख नेते मंडळींचा सूर
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन

काय आहे निकाल?

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातल्या याचिकेवर निकाल देताना याचिकाकर्त्या व्यापाऱ्यांनाच सवाल केला आहे. “तु्मही मराठी भाषेत बोर्ड का ठेवू शकत नाहीत? तेही पुरेशा आकारात? कर्नाटकातही असाच नियम आहे. नाहीतर ते मराठी अक्षरं छोटी ठेवतील आणि इंग्रजी मोठी. यात कसलं आलंय मूलभूत अधिकारांचं उल्लंघन? दसरा-दिवाळीच्या आधीच मराठी भाषेतले बोर्ड लावण्याची वेळ आहे. तु्म्ही महाराष्ट्रात आहात. मराठी भाषेत बोर्ड लावण्याचे फायदे तुम्हाला माहिती नाहीत का? नवे बोर्ड तुमच्या व्यवसायवृद्धीचा एक भाग होऊ शकतात. जर आम्ही तुम्हाला यावर मुंबई उच्च न्यायालयात पाठवलं, तर तुम्हाला मोठा दंड बसेल”, असं न्यायालयानं यावेळी याचिकाकर्त्यांना सांगितलं.

VIDEO: “नार्वेकरांना कुणी काय मार्गदर्शन केलं याची…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल, म्हणाले…

राज ठाकरेंची पोस्ट

या निकालाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे. “ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे”, असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी. हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका”, असा इशाराच राज ठाकरेंनी व्यापाऱ्यांना दिला आहे.

Story img Loader