मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात अंतर्गत कलह सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांना ‘भावी मुख्यमंत्री’ संबोधत बॅनरबाजी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागले. यामुळे पुन्हा एकदा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात अंतर्गत कलह सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर आज भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदर सुप्रिया सुळे यांचा बॅनर लागला आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आता भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे राज्यभर बॅनर लागले की वर्तुळ पूर्ण होईल, अशी टोलेबाजी गजानन काळे यांनी केली आहे.

हेही वाचा- “ते चॉकलेट बॉय…”; रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांची उडवली खिल्ली, म्हणाले…

एक व्हिडीओ जारी करत गजानन काळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवल्यावर राष्ट्रवादीचे नेते स्वत:चा पक्ष संपवण्याच्या नादी लागले आहेत. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ते भावी मुख्यमंत्री असतील, असे बॅनर लागले होते. तो वाढदिवस संपत नाही, तोपर्यंत अजित पवार यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील कोल्डवॅार काही नवीन नाही. आता सुप्रिया सुळे यांच्या नावानेही भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत.

हेही वाचा- “होय, मी बीफ खातो, याला कोणीही रोखू शकत नाही”, भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान!

राष्ट्रवादीचे तीन भावी मुख्यमंत्री उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर लागले की वर्तुळ पूर्ण होईल, असा टोला गजानन काळे यांनी लगावला. तीन भावी मुख्यमंत्री एकाच पक्षात असल्याने आता कार्यकर्ते सतरंज्या उचलणार का? असा सवालही काळे यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns gajanan kale reaction on ncp internal dispute over upcoming cm jayant patil ajit pawar and supriya sule rmm