MNS Hingana Assembly Constituency : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुती यांच्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. भाजपाने बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दर्शवला आहे. तर, मनसेने आता हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे.

मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे या बदल्यात विधानसभेत मनसे महायुतीतून निवडणूक लढवेल अशी अटकळ बांधण्यात आली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. असे असले तरीही त्यांना काही ठिकाणी भाजपाने समर्थन दिलंय. शिवडी विधानसभेत भाजपाने उमेदवार उभा केला नसून बाळा नांदगांवकर यांना समर्थन देण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. तर, आता हिंगाणा मतदारसंघात मनसेचा उमेदवार उभा असतानाही मनसेने भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आहे. याबाबत मनसेने आज अधिकृत पत्रक काढत माहिती दिली.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद
Suresh Dhas On Ajit Pawar
Suresh Dhas : महायुतीमधील वाद चव्हाट्यावर? “घड्याळाचे आधीच १२ वाजलेत”, भाजपा नेत्याचा अजित पवारांवर हल्लाबोल
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >> प्रमुख पक्षांकडून ‘वरळी’कर उमेदवारच नाही

मनसेच्या एक्स पोस्टमध्ये काय म्हटलंय?

c

मनसेने एक्स खात्यावर पोस्ट करत म्हटलंय की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत ५० हिंगणा विधानसभेचे उमेदवार समीर दत्ताजी मेघे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर पाठिंबा देत आहे. काही प्रशासकिय अडचणींमुळे बिजाराम किनकर यांची उमेदवारी मागे घेता आली नाही. या पुढे बिजाराम किनकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार नाही. या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ५० हिंगणा विधानसभेत प्रचार करणार नाहीत. हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांची नोंद घ्यावी.”

हिंगाणा विधानसभा मतदारसंघातून भाजपाने समीर मोघे यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर, मनसेने बिजाराम किनकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु, उमेदवारी त्यांना मागे घेण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेता न आल्याने मनसेने या मतदारसंघात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी भाजपाचे उमेदवार समीर मोघे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

Story img Loader