निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेत हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गटाला दोन वेगळी चिन्हे दिली जाणार आहेत. दम्यान, याबाबत या निर्णयानंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नावाचाही करता येणार नाही वापर

काय म्हणाले अमेय खोपकर?

अमेय खोपकर यांनी ट्वीट करत “चिन्हं बदलतात, कुणाची गोठतात. मात्र, आमचं रेल्वे इंजिन मात्र सुसाट धावते आहे”, असा खोचक टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

हेही वाचा – निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; अनिल परब म्हणाले…

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरेंना धक्का देत ‘धनुष्यबाण’ चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. याबरोबच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गट ठाकरे गट आणि शिंदे गट, अशी नावे वापरू शकतो, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला वेगळे चिन्ह देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader amay khopkar tweet after election commision freez bow and arrow shivsena sign spb
Show comments