कोल्हापूर आणि सांगलीमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार पुढे सरसावले असतानाच दुसरीकडे बॉलिवूडमधील कलाकार गायब असल्याची टीका मनसेने केली आहे. मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला गरज असताना पूरग्रस्तांकडे पाठ फिरवणाऱ्या हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानंतर समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणाचे कौतुक केले आहे. मात्र त्याचवेळी ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’ असं म्हणत हिंदी कलाकारांवर टीका केली आहे. “महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून जे सांगतात ते बाॅलीवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमांचं प्रमोशन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही?,” असे सवाल खोपकर यांनी उपस्थित केले आहेत. पुढे बोलताना खोपकर म्हणतात, “कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असं म्हणतात. पण इथे प्रश्न गंभीर आहे, स्वत:ची मसीहा अशी प्रतिमा पडद्यावर रंगवणाऱ्या या स्टार्सना नेमका स्वत:च्या कर्मभूमीचाच कसा विसर पडतो हाच प्रश्न सतावतोय, आणि संतापही येतोय.”

मराठी कलाकारांचे कौतुक करताना खोपकर यांनी कलाकारांबरोबरच बॅकस्टेज आर्टिस्टही मदतकार्यात सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या पाण्याने थैमान घातलं. पाण्याची पातळी वाढत होती तशी लोकांची काळजी वाढत होती. स्वत:चा संसार उद्ध्वस्त होताना ते बघत होते. वीजेशिवाय राहत होते. समोर साचलेलं पाणी, डोळ्यात पाणी पण प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती होती. या सर्व काळात ‘एनडीआरएफ’चे जवान, आपत्कालीन विभागाची यंत्रणा यांनी जे काम केलं, लोकांचे जीव वाचवले, त्या कामाला सलामच केला पाहिजे. विविध स्वयंसेवी संस्थांनीही मदत पोचवायला सुरुवात केली. याच काळात मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार एकत्र आले आणि त्यांना अतिशय नियोजनपूर्वक मदतसामुग्री पोचवण्याची व्यवस्था केली. केवळ कलाकारच नाही तर अगदी बॅकस्टेज आर्टिस्टही पुढे आला. पुराचं पाणी ओसरु लागल्यावर आता खरं आव्हान आहे चिखल झालेले संसार सावरण्याचं… महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनेही आर्थिक स्वरुपात असेल किंवा गायींच्या चाऱ्याच्या स्वरुपात असेल, ही मदत रवाना केलेली आहे. समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणा बघून सगळेच भारावलेत.”

पोस्टच्या शेवटी खोपकर यांनी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या लोकांसाठी झटत राहतील असं म्हटलं आहे. “आम्ही आमचं काम करत राहू. आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू, यात कधीच खंड पडणार नाही,” असा विश्वास खोपकर यांनी पोस्टच्या शेवटच्या ओळीमध्ये व्यक्त केला आहे.