महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांशी हुज्जत घातली आहे. रस्त्यावरील महापालिकेच्या खांबांवर लावलेले मनसेचे झेंडे काढल्याने अविनाश जाधव आयुक्तांवर संतापले. त्यांनी अर्वाच्छ भाषेचा वापर करत महापालिका सहाय्यक आयुक्तांना सुनावलं आहे.
मनसेच्या शाखा उद्घाटनानिमित्त वसई विरार शहरातील अंबाडी रस्त्यावरील खांबांवर मनसेनं आपल्या पक्षाचे झेंडे लावले होते. हे झेंडे अनधिकृतपणे लावल्याने महापालिकेनं कारवाई करत संबंधित झेंडे हटवले. ज्यावेळी झेंडे हटवण्यात आले, तोपर्यंत मनसेचा कार्यक्रमही पार पडला नव्हता. त्यामुळे मनसे नेते अविनाश जाधव यांनी वसई विरार महापालिकेत जाऊन गोंधळ घातला.
हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी दावा ठोकलेलं ‘ते’ पदच बेकायदेशीर”, ठाकरे गटाच्या वकिलाचं मोठं विधान!
यावेळी अविनाश जाधव यांनी वसई विरारच्या सहाय्यक आयुक्तांशी हुज्जत घातली. त्यांनी “झेंडे काढताना तुमच्यात मर्दानगी येते ना?” अशा शब्दांत सहाय्यक आयुक्तगिल्सन घोणलासविस यांना सुनावलं. दरम्यान त्यांनी गलिच्छ भाषेचा वापरही केला. महापालिकेने आज दुपारी ही कारवाई केली होती. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे.