Avinash Jadhav Resignation Back : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. परंतु त्यांचा देखील पराभव झाला होता. दरम्यान, राजीनामा दिल्यास २४ तास उलटत नाहीत तोवर त्यांनी राजीनामा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा राजीनामा मागे घेत असल्याचं अविनाश जाधव म्हणाले.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष पद आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी निवडणूका लढविल्या होत्या. अविनाश जाधव यांनी सुद्धा ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांचा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला होता. या मतदारसंघात अविनाश जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर होते. ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला होता. अखेर अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदावरून राजिनामा दिला आहे. राजिनाम्याचे पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. परंतु, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. उलट त्यांना पुन्हा या दोन्ही जिल्ह्यांचं अध्यक्षपद सांभाळण्याचे आदेश देण्यात आले.

Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
actress Shobitha Shivanna suicide
अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”
Nitin Gadkari on Politics
Nitin Gadkari : “कुणी मुख्यमंत्री झाले नाही म्हणून दु:खी तर कुणाला मुख्यमंत्रीपदावरून…”, राजकीय नेत्यांबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?
Vijay Shivtare
Vijay Shivtare : Video : “तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाही का?”, पोलिसांनी गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; नेमकं काय घडलं?
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”

याबाबत अविनाश जाधव यांनी एक्सवर म्हटलंय की, “आदरणीय राजसाहेब माझ्या रक्तात आहेत.. राजसाहेबांनी मला ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून असलेली जबाबदारी पाहण्याचा आदेश दिला आहे. आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो आणि त्याचा सन्मान मी नेहमीच आदराने करतो.. मी महाराष्ट्र सैनिक प्रथम, बाकी पद नंतर.”

काम करत राहायचं, यश मिळेल तेव्हा मिळेल

अविनाश जाधव माध्यमांना म्हणाले, “काल मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ठाणे पालघरणध्ये एकही जागा निवडून आणली नव्हती. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारत मी राजीनामा दिला होता. माझ्याकडे पक्षात तीन पदे आहेत. पक्षाचं नेते पद आहे, नाभिक सेनेचे अध्यक्ष आहे. आणि ठाणे- पालघर जिल्ह्यांचं अध्यक्षपद आहे. त्यापैकी मी एका पदाचा राजीनामा दिला होता. उर्वरित मी नेता होतोच. मी नेता म्हणून काम करत होतोच. पण राज ठाकरेंनी मला आज बोलावून, आज त्यांनी पुन्हा आदेश दिला की ठाणे पालघर या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचं आहे. मी राज ठाकरेंच्या प्रत्येक आदेशांचं पालन केलं आहे. आजही त्यांनी जो आदेश दिलाय त्याचं पालन केलंय. राजीनामा वगैरे काही नसतं, असं राज ठाकरे म्हणाले. काम करत राहायचं. यश मिळेल तेव्हा मिळेल, असंही ते म्हणाले. त्यामुळे आजपासून मी दोन्ही जिल्ह्यांचा अध्यक्ष असेन.”

राजीनामा देताना अविनाश जाधव काय म्हणाले होते?

विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथील पराभवाची जबाबदारी घेऊन मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काम करताना माझ्याकडू कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण माफ करवावे असे त्यांनी पत्रात म्हटले होतं.